सोशल मिडियावर स्टेटस ठेऊन अल्पवयीन प्रेमी युगुलाने जीवन संपवलं

0
ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायला ही तयार व्हा, अन्यथा प्रेम करू नका. प्रेम करताना जात धर्म बघू नका, अशा प्रकारचा स्टेटस ठेवत शिरोली जिल्हा कोल्हापूरमध्ये अल्पवयीन प्रेमी युगालाने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात आणले आहेत,तेथे नातेवाईकांची मोठ्या प्रमाणत गर्दी केली आहे.

दोघांच्या घरातून प्रेमाला विरोध होत असल्याने प्रेमी युगुलाने नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून जीवन संपवलं आहे.कोल्हापुरातील शिरोली पुलाची येथील राहणाऱ्या एका अल्पवयीन जोडप्याने आपलं जीवन यात्रा संपवली असून आत्महत्या केलेले प्रेमी युगूल भिन्न समाजातील आहे.आत्महत्या केलेला तरुण १८ वर्षांचा तर युवतीचं वय १६ वर्ष असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. हे दोघेही अल्पवयीन एकाच गल्लीत राहत असून गेल्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेम संबंध होते पण दोन्ही समाज वेगळे असल्याने या प्रेम संबंधात घरच्यांकडून मोठा विरोध होता.मात्र आपल्या प्रेमास विरोध असून आपला विवाह होणार नाही, या भावनेतून शुक्रवारी रात्री मुलगी बाहेर पडली.
तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. ती रात्री प्रियकर मुलाच्या घरी गेली आणि तिथेच दोघांनी घरातील लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले.

हा प्रकार आज सकाळी समोर आला असून यानंतर नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली तर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी तरुणांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदन करण्यासाठी कोल्हापूर येथे पाठवून दिले आहे.

Rate Card
लहान वयात फुललेले प्रेम, समाजाची भिंत तोडून मुले-मुली आपले जीवन जगू पाहतायतं,मात्र कुणीही भविष्याचा विचार करत नाहीत.परिणामी जीवन फुलण्याआधीच मृत्यू कवटाळून घेताना,दोन्ही बाजूच्या आई-वडील कुंटुबियाची काय अवस्था होत असेल ‌यांचाही विचार होण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.