धम्मभूमीचा लोकार्पण सोहळा उत्साहात

0
जत : महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या गुगवाड येथे अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य धम्मभूमी उभारण्यात आली आहे. या धम्मभूमीचा लोकार्पण सोहळा शनिवारी होणार आहे. लोकार्पण सोहळ्यानिमित्य दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकार्पण सोहळ्यास देशभरातील ५० महाथेरु, ५०० हुन अधिक भंतेजी, हजारो बुद्ध उपासक, उपासिका यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या लोकार्पण सोहळयास जत तालुकावासियांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा चंद्रकांत सांगलीकर यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, प्रा. गौतम काटकर उपस्थित होते.
जत तालुक्यातील गुगवाडचे सुपुत्र असलेले उद्योगपती चंद्रकांत सांगलीकर यांचा एकुलता एक मुलगा अथर्व याचे २०१७ मध्ये निधन झाले. त्याच्या स्मरणार्थ गुगवाड येथे बुद्ध विहार बांधण्याचा संकल्प चंद्रकांत सांगलीकर व अपर्णा सांगलीकर यांनी केला. गुगवाड येथे त्यांनी काम सुरू केले पण बघता बघता येथे धम्मभूमी उभी राहिली. जत तालुक्याच्या वैभवात धम्मभुमीने भर पडली आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून धम्माचे संवर्धन करण्यासाठी आणि आदर्श समाज निर्माण करण्यासाठी सांगलीकर यांनी धम्मभूमी उभारली आहे.
शनिवारी धम्मभूमी लोकार्पण सोहळयानिमित्य दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.  शनिवारी सकाळी साडेआठ वाजता अथर्व चंद्रकांत सांगलीकर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे पूज्य भिक्कु संघाच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण, बुद्धमूर्ती पूजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा पूजन, पावणेदहा वाजता धम्मभूमी परिसरात औरंगाबाद येथील पूज्य भदंत  बोधीपालो महाथेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण, जयसिंगपूर येथील पूज्य भदंत डॉ. यश काश्यपायन महाथेरो यांच्या हस्ते बोधीवृक्ष वंदना, सकाळी दहा वाजता नांदेड येथील पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते धम्मभूमी विहार लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर बुद्धमूर्ती स्थापना, क्षमा याचना, आदी कार्यक्रम होणार आहेत.
दुपारी दीड ते चार दरम्यान धम्मदेसना होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ येथील पूज्य भदंत धम्मसेवक महाथेरो राहणार आहेत. यावेळी औरंगाबाद येथील पूज्य भदंत  बोधपालो महाथेरो, पूज्य भदंत इंदवंस महाथेरो, पूज्य भदंत डॉ. सत्यपाल महाथेरो, कोल्हापुर येथील पूज्य भदंत डॉ. यश काश्यपायन, नांदेड येथील पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, पूज्य भदंत खेमधम्मो महाथेरो , अमरावती येथील पूज्य भदंत सत्यानंद महाथेरो,मैसूर येथील पूज्य भदंत बोधीरत्न महाथेरो, नागपूर येथील पूज्य भदंत सत्वशील महाथेरो उपस्थित राहणार आहेत.
■अशी आहे गुगवाडची धम्मभूमी
★ २० एकराच्या परिसरात धम्मभूमी
★ शंभर बाय शंभर क्षेत्रात दुमजली देखणी इमारत
★इमारतीवरती चाळीस बाय चाळीस असा आकर्षक स्तुप (घुमट) आहे. १६ कॉलमच्या आधारावर या स्तुपाची रचना करण्यात आली आहे.
★ खालच्या मजल्यावर तीन फुटाच्या चबुतऱ्यावर १२ फुटाची बुद्धाची आकर्षक बैठी मूर्ती
Rate Card
★ एक हजार उपासक, उपासिका बसू शकतील असा हॉल
★भिक्कु आणि भिक्कुनीसाठी प्रशिक्षण केंद्र
★ सभेसाठी ३० हजार स्क्वेअर फुटाचे दोन सभागृह
★ १२ लाख लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याची टाकीची उभारणी
★भव्य प्रवेशद्वार, धम्म परिसरात सुसज्ज ग्रंथालय
★ देश, विदेशातून येणाऱ्या उपासक, उपसिकेच्या राहण्याची, जेवणाची मोफत व्यवस्था
■■■

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.