मौर्य क्रांती महासंघाच्या अधिवेशनाला जेजुरीत जतेतील समाज बांधवांची उपस्थिती 

0
जत,संकेत टाइम्स : मौर्य क्रांती महासंघाच्या पहिल्या राज्य अधिवेशनास जेजुरीत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.मौर्य क्रांती महासंघ तर्फे जेजुरी गडावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक स्थळी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून अभिवादन केले.यावेळी मौर्य क्रांती महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते समाज बांधवांनी स्मारक स्थळी क्रांतीची मशाल पेटवून समाजाला  जागृत करण्याचा संकल्प केला.यावेळी जेजुरी गडावर परिषदेचे उदघाटक इंजि. शिवाजीराव शेंडगे (सांगली),संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  बलभीम माथेले (परभणी ),प्रदेश अध्यक्ष राजीव हाके (धुळे ) यांच्या प्रमुख उपस्थितीत जेजुरी गडावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक जेजुरीत लक्षवेधी ठरली. ढोल गर्जना करत जय मल्हार सांस्कृतिक भवन येथे मिरवणुकीची सांगता झाली.
दहा वाजता पारंपरिक गजी धनगरी ढोल वादन,सुंबरान आणि चांगभलंचा जयघोष करत शाहीर सागर माने आणि पथका च्या पहाडी आवाजाने परिषद राज्य अधिवेशनास प्रारंभ झाला. राज्य भरातून बहुजन समाज बांधव या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मौर्य क्रांती महासंघाचे जेष्ठ मार्गदर्शक इंजि. शिवाजी शेंडगे (सांगली )यांच्या अभ्यासपूर्ण उदघाटनपर भाषणाने परिषदेला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. सामाजिक मरगळ आलेल्या  समाजात एक चैतन्य निर्माण करणारं, हे एक वैचारिक केडर बेस संघटन असल्याचे ते म्हणाले.
सर्व जातींची जातनिहाय जनगणना का? व कशासाठी?
Rate Card
संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिल्याने, सर्व जातींची प्रगती होणे शक्य आहे. एकट्याने नव्हे तर एकीने लढावे लागेल, त्या शिवाय पर्याय नाही. आदी अभ्यासपूर्ण विषयांवर या परिषदेत सखोल वैचारिक प्रबोधन, चिंतन झाले.संस्थापक अध्यक्ष बलभीम माथेले यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या परिषदेला संबोधित करताना राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणारे कमलकांत काळे (राष्ट्रीय अध्यक्ष,BAMCEF, नवी दिल्ली) यांनी पत्रिकेतील विषयांवर मत व्यक्त करतांना, खंडोबा ही समस्त  बहुजन समाजाला जोडणारी विरासत आहे. येथूनच राष्ट्रपिता महात्मा फुलेनी प्रेरणा घेतली व सत्यशोधक समाजाची स्थापना केली असल्याचे स्पष्ट करत  बहुजन समाजाच्या वर्तमान स्थितीवर भाष्य केले. समाजातील खरे खोटे मुखवटे, नेतृत्व यांच्यातील फरक समाज बांधवांनी वेळीच ओळखावा व संघटित होऊन, समाजाला दिशा देण्याचे आवाहन केले.

 

 

दोन सत्रात झालेल्या या परिषदेला मौर्य क्रांती महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी ॲड.उत्तमभाई कोळेकर (रायगड) आणि विभागीय पदाधिकारी तुकाराम जानकर (सातारा ), प्रकाश कुटे (वाशीम) किरण मासुळे (धुळे), संतोष गावडे (कोकण),साईनाथ बंडगर (कोकण) जी. के. सूर्यवंशी (नासिक) सत्यवान दुधाळ (सोलापूर ) गोपीचंद वडितके (पालघर), सुभाष येळे (मुंबई),दत्ता भरणे, डॉ. प्रशांत साळवे, डॉ. दत्तात्रेय जगताप, मनोहर कोकरे (प. महाराष्ट्र ) विजय वसतकर (बुलढाणा) यांची विशेष उपस्थिती लाभली.

 

दुसऱ्या सत्रात. सत्यशोधक विचारवंत गोविंदराम शूरनर यांना सत्यशोधक मारोतीराव पिसाळ मामा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पहिला सत्यशोधक प्रबोधनकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. खुल्या राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेच्या विजेत्या तीन स्पर्धाकांचा त्यात कवी बालाजी भागानगरे, कवी रणजित माळगे, गीतांजली पाटील यांना रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी सत्यशोधक पद्धतीने विवाह बद्ध आदर्श जोडप्यांचा सन्मान करण्यात आला. वाघर चित्रपटातील मुख्य अभिनेत्री, इतर कलावंत आणि चित्रपट निर्माते राजेंद्र बरकुडे या कुटुंबाला सन्मानित करण्यात आले. यावेळी “धनगर टाइम्स” या वृतपत्राचे, गोविंद शूरनर लिखित “बहुजनांचे प्रबोधन” लिखित “महानायक खंडोबा” या ग्रंथाच्या मुखपृष्ठचे देखील प्रकाशन करण्यात आले..
यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे कल्याणराव दळे, ओबीसी राज्य संघटक मुबारक नदाफ, तुकाराम माळी, मुंबई महापालिका पूर्व आयुक्त लक्ष्मण व्हटकर (मुंबई), धनगर कर्मचारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अंकुश निर्मळ, ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रवीण काकडे, शेगर महासंघाचे सुनील भगत, पत्रकार रमेश लेंडे,भारत क्रांती संघटनेचे पी. बी. कोकरे, युवा मल्हार सेनेच्या धनश्री आजगे, ॲड.जोतिबा पिसाळ, उद्योजक आनंदा होनमाने (बेंगलोर), मल्हार आर्मीचे राहुल मदने यांची अभ्यास पूर्ण भाषणे झाली. यावेळी इतिहास संशोधक संचित धनवे यांनी महानायक खंडोबा यांच्या संघर्षाची गाथा मांडत, खंडोबा आमचे प्रेरणा महापुरुष असल्याचे आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून स्पष्ट केले.

 

अध्यक्षता करताना बलभीम माथेले यांनी संघटन शक्ती आणि समाजाच्या सद्य स्थिती वर  भाष्य करत “एकट्याने नव्हे तर समाजातील सर्व संघटनांचं नेतृत्व करणाऱ्या बुद्धिजीवी समाज बांधवांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करत, एकट्याने नव्हे तर एकीने लढण्याचे उपस्थित बांधवांना आवाहन केले.”
यावेळी जेजुरी येथील माजी नगर सेवक संपत कोळेकर, देवस्थानचे विश्वस्त संदीप जगताप, यशवंत पडळकर,संतोष खोमणे, मोहन खोमणे,अशोक बरकडे,शिवाजी पिसे, गणेश कोळपे यांची आणि जेजुरी परिसरातील मान्यवर समाज बांधव याचे विशेष सहकार्य लाभले. अधिवेशन चे प्रास्तविकातून राज्य प्रभारी ॲड. उत्तमभाई कोळेकर यांनी मौर्य क्रांती महासंघ या संघटनेचे ध्येय धोरण, एकजुटीची ताकद निर्माण करणारे पहिले एकमेव संघटन आहे,संघटनेच्या आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा, हे संघटन समाजामध्ये प्रबोधन, प्रशिक्षण, प्रोत्साहन,प्रतिनिधीत्व मग नेतृत्व या टप्प्यातूनच नेतृत्व कसे निर्माण करत आहे..हे स्पष्ट करत, समाज मन जागृत करणारी ही ऐतिहासिक परिषद असल्याचे स्पष्ट केले. तर संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजीव हाके यांनी आपल्या खास बहारदार शैलीतून परिषदेत रंगत आणली.  अंतरबाह्य खडबडून जाग आणणारी ही परिषद खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरल्याचे मत यावेळी राज्य भरातील समाज बांधवांनी व्यक्त केले येथून खऱ्या अर्थाने समाज जागृतीचे रणशिंग फुंकले गेल्याचे समाधान घेऊन समाज बांधव आपल्या घराकडे परतले.

 

 

या ऐतिहासिक  जागृती परिषदेच्या यशस्वीते साठी  मौर्य क्रांती महासंघ च्या महीला विंग च्या शैला नवघरे, इंजि. भगवान कोल्हे, सूर्यकांत पुजारी, संदीप दासनोर, गुरुगोविंद सोन्नर, शिवाजी वैद्य, सुरेश शिंदे, चंद्रकांत बंडगर, सुभाष शेंगुळे, हनुमंत दवंडे (सचिव), निलेश बनकर, राम पिसाळ, कालिदास चोरमले, प्रा.रंगराव गढरीं, राजु आखाडे, रामचंद्र बावदाने (रायगड),श्रीकृष्ण डुबे, अनिल हाके,प्रकाश माने,डॉ.रविंद्र बंडगर,दिवाकर कुकडे, सचिन धायगुडे,संतोष सरक, आण्णा बोरकर, लहानु कोळेकर, मनिषा दुगाणे, प्रकाश इंगळे, अशोक भिवटे, शांतीलाल बनसोडे, गजानन कष्टे, राजकुमार नव्हाळे, नवघरे सर,केशव पाथरकर सर, होळकर सर, देवकाते सर, खेमचंद पाकळे, इत्यादी,असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच या परिषदेसाठी आर्थिक दृष्टया मदत करणारे सर्व समाज बांधव यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन परिषद यशस्वी केली.. यावेळी झालेल्या विशेष मुलाखतीत प्रदेश अध्यक्ष राजीव हाके यांनी मौर्य क्रांती महासंघाच्या आगामी वाटचाली विषयी माहिती देतांना, सलग दहा वर्ष जेजुरी येथेच दर वर्षी परिषद होणार असल्याचे सुतोवाच केले. मौर्य क्रांती महासंघ हे पूर्णतः सामाजिक आणि सांस्कृतिक संघटन असून, ते एक केडर बेस संघटन असून, समाजाच्या आणि कार्यकर्त्याच्या कष्टाच्या पैशातून उभे राहिलेले  संघटन असल्याचे नमूद केले.यावेळी मौर्य क्रांती महासंघाच्या बुक स्टॉल वरून मोठया प्रमाणात समाज बांधवांनी पुस्तके खरेदी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.