जत तालुक्यातील प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला | ८१ गावात सत्तासंघर्ष रंगणार ; बैठकांना वेग

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम या निवडणुकीच्या माध्यमातून पाहावयास मिळणार आहे.८१ गावात गुप्त बैठकीला जोर आला आहे. शिवाय या टप्प्यात काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रासप, शिवसेना या पक्षातील प्रमुख राजकीय नेत्याबरोबरच पहिल्या फळीतील राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना जत तालुक्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश या भागातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या प्रसिद्ध श्री यल्लमादेवीची यात्रा दि १९ डिसेंबर ते २३ दरम्यान होणार असल्याने मतमोजणी २० डिसेंबर रोजी त्यामुळे प्रशासनावर ताण येणार असल्याचे चित्र आहे.यंदा सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार
असल्याने गावकारभाऱ्यांकडून प्रभावी उमेदवाराचा शोध घेतला जात आहे.

 

शिवाय काही गावात सरपंचपदाचे आरक्षण असल्याने योग्य उमेदवार व त्यासाठी लागणारे विविध जातीचे दाखले जमा करण्यासाठी गावातील प्रमुख नेत्यांना धावपळ करावी लागणार आहे. तर तालुक्यातील मुख्य नेत्यांच्या गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी पहावयास मिळणार आहे. नेत्यांची नावे व त्यांच्या गावाची यादी पुढीलप्रमाणे आहे.

 

आमदार विक्रमसिंह सावंत (सुसलाद),राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बसवराज पाटील व भाजपचे माजी सभापती आर. के. पाटील (संख), राष्ट्रवादीचे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक प्रकाश जमदाडे (येळवी), सरदार पाटील (आसंगी जत),आनंदराव पाटील (दरीबडची), विष्णू चव्हाण व सोमाण्णा हाक्के (माडग्याळ), श्रीनिवास भोसले, प्रभाकरभाऊ जाधव, नाथा पाटील(कुंभारी), पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय सावंत (बनाळी), राष्ट्रवादीचे माजी उपसभापती शिवाजी शिंदे (वाळेखिंडी), आकाराम मासाळ(बाज), अॅड. चन्नाप्पा होर्तीकर ( उमदी)
जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब व
पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण (डफळापूर), माजी सभापती संतोष पाटील(सोन्याळ), काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील (मुचंडी), भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, समाधान शिंदे(अचकनहळ्ळी), राष्ट्रवादीचे
सरपंच आण्णासाहेब कोडग (आवंढी), आदी गावात प्रतिष्ठेच्या लढती होणार आहेत.
या गावात चुरशीची लढत होणार :
वाळेखिंडी,कुंभारी,कोसारी,बनाळी,आवंढी, डफळापूर, बिळूर, बाज, दरीबडची, मुचंडी, संख,उमदी, जाडरबोबलाद, सोन्याळ, सालेगिरी-पाच्छापूर, दरीकोणूर या ग्रामपंचायतीच्या निवडणूका चुरशीने होणार आहेत. सरपंच सर्वसाधारण पुरुषांसाठी राखीव असल्याने निवडणुका लक्षवेधी होणार आहेत.बिनविरोध होण्याची शक्यता असणारी

 

बिनविरोध होणारी गावे
रावळगुंडवाडी ग्रामपंचायतीची स्थापना
झाल्यापासून निवडणुका झाल्या नाहीत. तर पांढरेवाडी, मोकाशेवाडी,बागलवाडी,नवाळवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका
Rate Card
अपवाद वगळता बिनविरोध झाल्या आहेत.यावर्षी बिनविरोधची परंपरा राखणार की निवडणुका होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ओपन संरपच पदामुळे चुरस
दरीबडची, डफळापूर, उमदी, जाडरबोबलाद,बाज, सोन्याळ, सालेगिरी-बालगाव, दरीकोणूर या ग्रामपंचायतीच्या निवडणूका चुरशीने होणार आहेत. सरपंच सर्वसाधारण पुरुषांसाठी राखीव असल्याने
निवडणुका लक्षवेधी होणार आहेत.
या गावात सत्तासंघर्ष रंगणार
अंत्राळ, बोर्गी खुर्द, बसर्गी,बेंळूखी, बिरनाळ, जालिहाळ बू, खंडनाळ,लवंगा, मिरवाड, मुचंडी, रेवनाळ, सोन्याळ,तिप्पेहळ्ळी, गुळवंची, काराजनगी, खलाटी,कोळगिरी, अचकनहळ्ळी, आक्कळवाडी,बागलवाडी, हिवरे, जिरग्याळ, दरीकोणर,करजगी करेवाडी (को.), लकडेवाडी,लोहगाव, मोटेवाडी, नवाळवाडी, रामपूर,
रावळगुंडवाडी, सिंदूर, तिल्याळ, व्हसपेठ,
वाषाण, आंवढी, बागेवाडी, बालगाव, बिरनाळ,धुळकरवाडी, एकुंडी, गिरगाव, गोंधळेवाडी,हळ्ळी, कागनरी, खैराव, कोसारी, कुणीकोणूर,पांढरेवाडी, प्रतापपूर,
सालेकिरी,साळमळगेवाडी, शिंगणापूर, सोरडी, वायफळ,अमृतवाडी, बेळोंडगी, बेवनूर, कंठी,खोजानवाडी, मोकाशेवाडी, निगडी खु, वज्रवाड,काशिलिंगवाडी,माणिकनाळ,पांडोझरी,बिळूर,वाळेखिंडी,बोर्गी,गुलगुंजनाळ, खिलारवाडी या
निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.