लताताई बोराडे यांची विधवा सन्मान चळवळ राज्यभर यशस्वी होणार | – आर.एस. कुलकर्णी

0
आटपाडी :  लताताई बोराडे यांच्या विधवा सन्मान चळवळीच्या ३० वर्षाच्या खडतर तपश्यर्चेयेला शेटफळे गावाने दिलेली लक्षवेधी साथ लताताई बोराडे यांच्या कार्याचा विजय जवळ आल्याचे स्पष्ट करणारे हे सुचिन्ह आहे,असे गौरवोदगार आर.एस.कुलकर्णी, प्रा.विजय लोंढे यांनी काढले.विधवा प्रथा बंदीचा कायदा व्हावा. विधवांना सुहासिनींची दर्जा मिळावा या साठी ३० वर्षे झगडत असलेल्या लतादेवी बाळकृष्ण बोराडे यांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रच्या वतीने जाहीर केला गेलेला पुरस्कार वितरण आणि ४४ विधवांना सुहासिनीं प्रमाणे सन्मानीत करणाऱ्या शेटफळे गावच्या सरपंच सौ. सुप्रियाताई नागेश गायकवाड, उपसरपंच तथा चित्रपट अभिनेते विजय देवकर यांच्या माध्यमातून तमाम शेटफळे करांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आज येथे संपन्न झाला.

 

शिक्षण तपस्वी बी.ए.भिंगे सर मोफत वाचनालय आटपाडी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र शाखा आटपाडी आणि जाएटंस ग्रुप आटपाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .लतादेवी बोराडे सौ सुप्रिया गायकवाड आणि विजय देवकर यांचा शाल, पुष्पगुच्छ, एकटा हे पुस्तक आणि सन्मान चिन्ह देवून प्रथमतः सन्मान केला गेला . कोजागिरी पोर्णीमेला लहान मुली, कुमारीका, वयोवृद्ध माताभगिनी , विधवा आणि सुहासिनींना हळदी कुंक लावून दुध देणाऱ्या माझ्या धर्मपत्नीने १९७५ ते २००७ पर्यत आटपाडीत आणि नंतर आज अखेर कोल्हापुरात अशी ४७ वर्षे सर्व समानतेचा उपक्रम कसलाही गाजावाजा न करता राबविला आहे . आम्ही आमच्या वागण्या बोलण्यातून वैज्ञानिक आणि डोळस गोष्टींना कृतीशील प्राधान्य दिल्याचे सांगून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते, शिक्षण तपस्वी आर.एस. कुलकर्णी यांनी लता बोराडे यांना त्यांच्या लढ्याची सुरुवात स्वत : पासून करण्याचा सल्ला आपण २० वर्षापूर्वी दिल्याचे सांगितले .

 

Rate Card
                लताताई बोराडे यांच्या वाट्याला आलेल्या दुः ख, यातनांची तीव्रता आपल्याला तेवढ्या तीव्रतेने कळणार नाही . तथापि प्रत्येक अमाणूस प्रथे विरुद्ध सर्वांनी संघटीत पणे प्रयत्न केल्यास अपेक्षित यश मिळेल . शेटफळे सारख्या जुन्या पुराण्या चाली रिती, गोशा शेलकट वापरणार्‍या घरंदाजपणाचा पगडा असणारे सगळे गावच लताताई बोराडेंच्या  परिवर्तनाच्या चळवळीत उतरले हे आश्चर्य असले तरी शेटफळे हे गाव या चळवळीला दिशा देणारा यशाचा मैलाचा दगड बनु शकेल असा आशावाद बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . विजय लोंढे सर यांनी व्यक्त केला .सर्व क्षेत्रात आघाडीवर असणारे धाडशी, कणखर, अभ्यासू, चिवट, झुंझार, लढवय्ये, प्रत्येक शेटफळेकर आटपाडी तालुक्याचे भुषण आहे . जगाचे परिवर्तन करण्याची प्रेरणा, ताकद, विदवत्ता शिक्षकांकडे आहे . आटपाडी तालुक्यात शिक्षकांचा समृद्ध वारसा आहे. शिक्षक आणि शेटफळेकर यांनी आटपाडी तालुक्याच्या प्रत्येक क्षेत्राला पुढे आणण्यासाठी प्रेरीत व्हावे . यांची सांघीक ताकद आटपाडी तालुक्याला, देशात अव्वल आणण्यात यशस्वी होवू शकते . यासाठी शिक्षक आणि शेटफळेकरांनी स्वतः ला समर्पित करीत झोकुन द्यावे. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी केले . लताताई बोराडे यांच्या लक्षवेधी कार्याची दखल महाराष्ट्र आणि शासन घेईलच याची चुणूक वज्रधारी शेटफळे करांच्या लक्षवेधी समर्थनातून आल्याची ग्वाही सादिक खाटीक यांनी दिली .

 

                सिने अभिनेते शेटफळेचे उपसरपंच विजय देवकर यांनी लताताई बोराडे यांच्या विचारधारेला शेटफळेकरांनी आत्मसात करावे यासाठी केलेल्या प्रयत्नांची पार्श्वभूमी सांगून प्रत्येक परिवर्तनाचे पाऊल शेटफळेतून पहिल्यांदा उठेल. त्यादृष्टीने शेटफळे पावले टाकत असल्याचे सांगितले .लताताई बोराडे यांनी ३० वर्षाच्या खडतर जीवनाचा आढावा घेताना माझ्या या परिवर्तनाच्या लढाईत शेटफळेकरां सारखी  सर्वांनी तळमळीने आणि ताकदीने साथ दिल्यास दमछाक होत चाललेला माझा जीव, नव्या जोमाने, उत्साहाने आणि गतीने पुढे कार्यरत होईल.असा आशावाद व्यक्त केला.प्रारंभी स्वागत प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष स. नि.उर्फ एस. एन. पाटील सर यांनी केले तर सुत्रसंचालन एम.बी. कदम सर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.