सुभाषराव गायकवाड डफळापूर ग्रामपंचायत थेट संरपच निवडणूक लढणार
Post Views : 195 views
डफळापूर,संकेत टाइम्स : डफळापूरचे जेष्ठ नेते, मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष, जत पश्चिम भागातील काका म्हणून परिचित असलेले श्री. सुभाषराव गायकवाड हे डफळापूर ग्रामपंचायतची थेट संरपच पदासाठी निवडणूक लढविणार आहेत.
सामाजिक कार्यात किंबहुना प्रत्येक अडचणीतील कुंटुबांना आधार असणारे सुभाष काका यावेळी थेट संरपच पदासाठी निवडणूक लढविणार आहेत.त्यांना लोंकाचा चांगला पाठिंबा मिळत आहेत.
कायम जनहितासाठी धडपडणारा आपला माणूस म्हणून काकांना ओळखले जाते.1948 ला जन्मलेल्या कांकाचे प्राथमिक,माध्यमिक शिक्षणही डफळापूरात झाले. वयाच्या वीस वर्षापासून काकांना समाजसेवीची ओढ लागली,तेव्हापासून आजपर्यत ते सतत कोणताही भेद न मानता सामाजिक कामात अग्रक्रमाने पुढाकार घेतात. त्यांचे हे कार्य अखंड सुरू आहे. त्यांनी आजपर्यत अनेक दिनदुबळ्यांना,संस्थाना सढळ हाताने मदत केली आहे.परिसरातील अनेक धार्मिक स्थळांना मोठी मदत केली,अनेक मंदिरांचा पुढाकार घेत जीर्णोद्धार केला आहे. कोरोना,दिवाळीसह अनेक सणांना त्यांनी गरजूंना मोठी मदत केली आहे. प्रत्येक सामाजिक ते अग्रस्थांनी असतात.
आपल्या मालकीचा सहा एकर जागा त्यांनी डफळापूरातील शासकीय कार्यालयांना मोफत दिली आहे. अशा सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा राज्य,जिव्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.गावच्या अनेक प्रश्नासाठी ते हिरीरीने पुढे असतात.अनेक आंदोलनातून त्यांनी लोकांना न्याय मिळवून दिला आहे. येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत ते थेट संरपच पदाचे उमेदवार असणार आहे.त्यांचा विजय निश्चित असल्याचा त्यांच्या समर्थकांनी दावा केला आहे.

काकाचे विशेष उल्लेखनीय कार्य– ग्रामपंचायत डफळापूर,सरकारी दवाखाना,सह सर्व शासकीय कार्यालयाना कित्येक एकर जमिन मोफत दिली.– चर्मकार समाजमंदिर बांधणेसाठी 4 गुंठे जमिन मोफत दिली.– 20 वर्षापासून दलितमित्र,जनसामान्याचे काकां म्हणून ओळंख– हायस्कूल इमारत,अनेक मंदिरासाठी लाखोच्या देणग्या देत मदत केली.– एकविरा मंदिर,मराठी शाळा, कुपनलिका खोदून पिण्याच्या पाण्याची ,दिवाबत्तीची स्व:खर्चातून सोय केली.– एकविरा मंदिर,विठ्ठल,रूकुमाई मंदिर,परशुराम मंदिर, कुडणूरच्या हनुमान मंदिरास शिखरासाठी मोठी मदत– प्रवाशाच्या सोयीसाठी जत-सांगली मार्गावर स्व:खर्चातून एसटी पिकअप शेड उभारले.– कोरोना काळात,जीवनावश्यक वस्तू,मास्क,सँनीटायझरचे वाटप केले, गरीब रूग्णांना आर्थिक मदत केली.– मराठा स्वराज्य संघाच्या माध्यमातून गेल्या तीन दशकापासून निस्वार्थ सामाजिक कार्य सुरू आहे.
डफळापूरच्या सर्वांगीण विकासाठी मैदानातडफळापूर तालुक्यातील मोठे गाव आहे.येथे मोठा निधी आला,मात्र अपेक्षित विकास झालेला नाही,रस्ते,गटारी,पाणी,विजेसह अनेक प्रश्नासाठी नागरिकांचे हाल होत आहेत.हे प्रश्न कायमस्वरूपी गावाचा नावलौकिक मिळविण्यासाठी मला मतदारांना साथी द्यावी.नुसते हिवरे बाजार सारखे गाव करणार घोषणा करणार नाही,तर गावचा विकास करून गावाला हिवरे बाजारचे प्रतिरूप बनविण्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत.– सुभाषराव गायकवाड,थेट संरपच पदाचे उमेदवार