सांगली जिल्हा बँकेतून १ वर्षात ६२२.३८ कोटीचे कर्ज वाटप  प्रकाशराव जमदाडे व मन्सूर खतीब यांची कामगिरी

0
कोणतेही पद मिळूदे त्यांचा जास्तीत जास्त लोकांना सर्वाधिक फायदा करून द्यायचा
हेच ध्येय असणारे बोटावर मोजण्याएवढे पदाधिकारी आहेत.
त्यात जत तालुक्यात एक नाव प्राधान्याने घ्यावे लागेल ते म्हणजे प्रकाशराव जमदाडे…
मार्केट कमिटी असूदे,पंचायत समिती असूदे अथवा जिल्हा बँक जमदाडे यांनी या संस्थाच्या माध्यमातून जत तालुक्यातील हाजारो नागरिकांना लाभ मिळवून दिला आहे,निधी खेचून आणला आहे.अनेकांना उभे केेले आहे,हाताला काम दिले आहे.प्रत्येक वेळी लोकहित हेच जमदाडे यांनी अंगीअवगत केलेला सर्वोत्तम गुण आहे.त्यांचा प्रत्यय तालुक्यातील जनतेला आलेला आहे.आताही प्रकाशराव जमदाडे व सहकारी मन्सूर खतीब यां दोघांनी जिल्हा बँकेत निवडून आल्यानंतर सोसायटी, बँकेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची किमया साधली आहे.

 

बँकेच्या ओटीएस योजनेतून तब्बल ८८४ शेतकऱ्यांना ६.५५ कोटी रूपये व्याजात ‌सुट मिळवून दिली आहे. या योजनेतून अनेक वर्षापासून थकीत कर्जदार हा ठपका शेतकऱ्यांवरून काढण्याचे काम जमदाडे,खतीब यांनी केले आहे.मागील ६ वर्षात जिल्हा बँकेत बेंबदशाही चालत होती.२३ नोव्हेंबर रोजी मतदारांनी प्रकाशराव जमदाडे,मन्सूर खतीब यांना निवडून देण्याची किमया केली.त्याचे उत्तरदायित्व म्हणून जमदाडे,खतीब यांनी गेल्या वर्षभरात बँकेची वसूलीतर केलीच,मात्र त्या बरोबरीने तालुक्यातील हाजारो शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून दिला आहे. आता जिल्हा बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज मिळणारचं हा विश्वास तयार झाला आहे.
आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ,महात्मा फुले मागास वर्गीय विकास महामंडळ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ,इतर मागास वर्गीय विकास महामंडळ,वंसतराव नाईक व्ही. जे. एन. टी. विकास महामंडळ,संत रोहितदास विकास महामंडळ या महामंडळातून मंजूरी मिळूनही राष्ट्रीकृत बॅकेतून तरुण बेरोजगार युवकांना सहजासहजी कर्ज उपलब्ध होत नव्हते, म्हणून वरील ६ महामंडळे बँकेच्या अखतारीत घेतले. शेतकऱ्यांना आवश्यक असणारे व शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण बॅकेच्या माध्यमातून करणेचा प्रयत्न केला आहे. पी. एम. किसान योजनेच्या माध्यमातुन २१ शेतकयांना ८८.०१ कर्ज मिळवून दिले. ३२ लाख अनुदान मिळाले. राज्य सरकार व केंद्र सरकारच्या सर्व योजना बॅकेच्या माध्यमातून राबवत आहोत. धेरणामध्ये बदल करून शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेत आहेत. अगदी टेलरीगच्या व्यवसाया पासुन ते ऊस तोडणी मशिन( हार्वेस्टींग मशीन ) सुद्धा सोसायटी व बँकेच्या माध्यमातून दिलेले आहे.

जत मार्केट यार्ड मुख्य शाखा, शोगाव, डफळापुर व रावळगुंडवाडी, येथील शाखेतील फर्निचर व दुरुस्तीची कामे १.१० कोटीचे चालू आहेत, ३५ सर्व सेवा सोसायट्यांना मायक्रो एटीएम देणेसाठी नाबार्ड कडून मंजुरी मिळाली आहे, लवकरच त्याचे वितरण करणेत येणार आहे.३० जून २०२० अखेर थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सरळ ६ टक्के व्याजदराने थकबाकी कर्ज मुक्ती होणेची संधी उपलब्ध करून दिली आहे. सन २१-२२ या आर्थिक वर्षात ८ सोसायट्या १०० टक्के वसूली झालेली आहे. येत्या वर्षात किमान २५ सोसायट्या १०० टक्के वसूली करणेचा मानस आहे.गुड्डापुर, बनाळी, वज्रवाड, वळसंग इत्यादी ठिकाणी नवीन शाखा करणेचे प्रस्तावित केले आहे.नाबार्डचे अर्थसहाय्यातून डफळापूर, बिळूर, बसर्गी, मुंचडी रावळगुंडवाडी तिकोंडी, उटगी कुंभारी इत्यादी सोसायट्यांना अर्थपुरवठा करून शेतकऱ्यांसाठी उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.आ.जंयतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते माजी आमदार विलासराव जगताप,बसवराज पाटील,सुरेशराव शिंदे,डॉ.रविंद्र आरळी यांच्या मार्गदर्शना खाली गत वर्षात सर्वोत्तम काम आम्ही केले आहे.
१ वर्षात ६२२.३८ कोटीचे कर्ज वाटप
बँकेतून गतवर्षात वाहन कर्ज ४७६ सभासदांना १४.८५,घरबाधणी ८३ सभासदांना ११.०४,लोन अगेन्स प्रोपर्टी ७१ सभासदांना ९.८१,कँश क्रेडिट ४३ सभासदांना ५.८५,पगारदार नोकर ९७५ सभासदांना ८७.२५,बँक सेवक वर्ग २५ सभासदांना २.१८,द्राक्षबाग उभारणी ६० शेतकऱ्यांना ३.८३,गोठा बांधकाम/दुभती जनावरे ५२ सभासदांना १.५५,ट्रक्टर व शेती अवजारे ३२ सभासदांना २.०३,शेतजमिन खरेदी ३ सभासदांना ५०.००,शेळीपालन २२ सभासदांना ३९.७४,विहिर/पाईप लाईन १० सभासदांना ४०.३८,कुक्कट पालन १ सभासदांना ६.७५,हारवेस्टींग मशीन १ सभासदांना ६०.००,पीक कर्ज ३१०८१ सभासदांना २३४.१३,साखर कारखाने २ सभासदांना ५३.०० असे तब्बल ३२,९३७ सभासदांना ६२२.३८ कोटीचे कर्जवाटप केले आहे.
महिलासाठी १ गाय/१ म्हैस योजना राबविणार
जत तालुक्यात मोठ्या संख्येने महिलांना रोजगार मिळावा म्हणून १ महिला(१ गाय/१ महिला)हि योजना राबविणार असून या माध्यमातून महिलांना कर्जपुरवठा त्या सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
९५ वर्षाच्या इतिहासातील ओटीएस पहिली योजना
बँकेच्या ९५ वर्षाच्या इतिहासात थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी पोत्साहन कर्ज अनुदान ओ टी एस योजनेची अंमलबजावणी केली.तालुक्यातील ८८४  शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.अजूनही लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा म्हणून सातत्याने जमदाडे,खतीब हे बैठका घेत आवाहन करत आहेत.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.