जिथं भेट होईल तेथे मतदारांच्या भेटीगाठी

0
3
करजगी : ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार अतिंम टप्यात आला आहे.त्यामुळे हळूहळू चांगलाच रंग भरू लागला आहे. उरलेल्या चार दिवसात मतांची जुळवाजुळव व उमेदवारांना मतदारांनी केलेल्या डिमांडच्या पूर्ततेवरच विजयाचे गणित मांडले जात आहे.

अनेक ग्रामपंचायतीसाठी अटीतटीची व प्रतिष्ठेची हायव्होल्टेज लढत होत आहे. अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही गावात चौरंगी लढती होत आहेत. मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने उमेदवाराची घालमेल वाढली आहे. थंडीत, पहाटेपर्यंत मतदारांचे उंबरठे झिजवू लागलेत. तर जिथं भेट होईल त्या ठिकाणी यंदा आपल्यावर लक्ष्य ठेवावं लागतय, अशी विनंती करुन पाया पडू लागले आहेत.ग्रामीण भागात आघाडी, युती, पक्ष, पार्टीचे उत्साही कार्यकर्ते प्रचारात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत मतदारांना आकर्षित करत आहेत. सोशल मीडियावर उत्साही कार्यकर्ते पॅनेलमध्ये उभे असलेल्या उमेदवारांच्या नावांसह त्यांचा भावी सरपंच अशा आशयाच्या पोस्ट प्रसारित करीत आहेत.

 

आणाभाका घेऊन मतांची गोळाबेरीज

ग्रामपंचायत निवडणूक पक्ष, पार्टीवर न होता गावातील हितसंबंध, नाती-गोती, मैत्री, एकमेकाच्या सुख-दुःखात कोण सहभागी झाले. अडचणीच्या वेळी कोण कोणाच्या मदतीला धावून आले, यावर होत असतात. असे असले तरी आजच्या काळात कोणीही मतदारराजावर विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे उमेदवार, नेतेमंडळी मतदारांना प्रलोभने दाखवून त्याच्याकडून काचोळी, भंडारा, गुलाल, देवाची काठी, अशा आणाभाका घेऊन मताची गोळाबेरीज करीत आहेत.

 

 

जोडण्या सुरू 

स्थानिक नेते पक्ष विरहित उमेदवार शोधून नव्या जोडण्या करण्यात व्यस्त आहेत.ग्रामपंचायत निवडणूकीत पक्षापेक्षा स्थानिक गटांना महत्व असते.एकगठ्ठा मतदान मिळवू शकतील अशा उमेदवारांना पँनेल प्रमुखांची पंसती असते.अशाच उमेदवारांचा शोध घेत पँनेलची बांधणीचे नियोजन केले जात आहे.अर्ज भरण्याची तारिख जवळ येत असल्याने बैठकांना जोर आला आहे.सक्षम उमेदवारांसाठी मनधरणी सुरू आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here