जत : पैसा हा सर्वश्रेष्ठ नसून आरोग्य संपत्ती ही सर्वात महत्वाची आहे. कोरोनाने माणूसकीची किमंत कळाली असे उद्गार छातीरोग तज्ञ डॉ अनिल मडके यांनी जत येथे काढले. श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजकडून आयोजित श्री ज्ञानेश्वर स्मृति व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना ते कोरोनानंतरचे जग या विषयावर बोलत होते.सुरुवातीस व्याख्यानमालेचे प्रायोजक जत तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष राजू माने,सचिव रामदास कोकरे, डॉ. सचिन वाघ, डॉ., विवेकानंद राऊत पापा कुंभार चिदानंद वळसंगकर यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. मडके म्हणाले, कोरोनामध्ये नात्यांची नव्याने खरी ओळख माणसांना झाली हे उदाहरणाव्दारे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना पूर्णत: संपला नसून त्याचे दुष्परिणाम आजहि जगाला जाणवतात. फक्त त्याची लक्षणे वेगवेगळी दिसतात. कोरोनावर मात करणेसाठी सुक्षित अतंर, सॅनेटायझेशन व मास्क वापरणे ही त्रिसूत्री पून्हा एकदा अधोरेखित केली. आरोग्यदायी जीवन जगतांना हरि- वरिल करी या तीन गोष्ट टाळाव्यात. याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. हरि (hurry) म्हणजे जेवतांना गडबड नको, वरी (Worry) म्हणजे चिंता नको तरी करी (Curry) म्हणजे तिखट जास्त नको असे ते म्हणाले.
रोगप्रतिकारक क्षमता वाढविणेसाठी चांगला आहार, प्रमाणात व्यायाम, भरपूर विश्रांत, व्यसन मुक्तता व भयमुक्तता या पंचसूत्रीवर भर दयावा. मोबाईलचे दुष्परिणाम सांगताना तरुणाना मोबाईल नावाच्या राक्षसापासून कसा धोका आहे ते स्पष्ट केले. माणसाचे जीवन हे गरुडझेपेप्रमाणें असावे. मान-अपमानाला फार महत्व देऊ नये तर माणूसकीस महत्व दयावे. कारण कोरोनाने मनुष्यजातीला पुन्हा एकदा माणूसकी शिकविली आहे.श्री. मडके यांनी लिहिलेल्या लैंगिकतेवर बोलू काही या पुस्तकाचा संदर्भ देत पालकांनी योग्य वयात योग्य पध्दतीने मुलांशी लैंगिकतेवर बोलण्याचे आवाहन मडके यांनी केले. व्यक्तिच्या वयानुसार त्याचेकडे किती दिवस जगायचे शिल्लक आहेत याचे आकडेवारी उदाहरणाने स्पष्ट केली. आपण जगा सोडून जाणेपूर्वी आपणाकडे शिल्लक असलेल्या या तासांचा हिशोब करुन आपले वागणे सुधारावे. यासाठी पैशाच्या मागे न धावता माणूसकी जपा असे आवाहन त्यांनी केले. व्याख्यानमालेस डॉ. श्रीपाद जोशी, माजी प्राचार्य रामचंद्र शितोळे, शालेयसमितीचे निमंत्रित सदस्य प्रभाकर जाधव, जतमधील प्रतिष्ठित व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
