आंवढीत आज चंपाषष्ठी निमित्त खंडोबाची यात्रा भरणार

0
आवंढी : आवंढी ता.जत येथील श्री.क्षेत्र खंडोबा मदिंर येथे शुक्रवार ता.२४ नोव्हेंबर ते मंगळवार २९ नोव्हंबर दरम्यान चंपाषष्ठी निमित्त चंपाषष्ठी उत्सव २०२२ आयोजन केले होते.आज मंगळवारी या उत्सवाचा शेवटचा दिवस असून विविध धार्मिक कार्यक्रम, व भव्य यात्रा भरविण्यात येणार आहे.
गुरूवारी श्री.खंडोबा देवाची घटस्थापना झाली होती.आज मंगळवार ता.२९ ला दुपारी १२ वा.देवाच्या घाटाचे विसर्जन होणार आहे.

 

 

 

Rate Card
त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना वह्या ‌वाटप,रांगोळी स्पर्धा,पालखी मिरवणूक,भंडारा उधळण,हळदी-कुंकू व साडी वाटप,महाप्रसाद,जागर व लंगर असे विविध कार्यक्रम होणार आहे.आज शेवटच्या दिवशी भव्य यात्रा भरणार आहे.त्यांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीसंत बाळूमामा सेवाभावी ‌संस्था, आवंढी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.