जत,संकेत टाइम्स : संभाजी ब्रिगेडच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी बेवनूर (जत)चे श्रेयश नाईक यांची निवड करण्यात आली.संभाजी ब्रिगेड ला 25 वर्षे पूर्ण झालेबद्दल पुणे येथे 28 डिसेंबर रोजी होणारा रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे नियोजन आणि पदाधिकारी निवड समारंभ सांगली येथे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, प्रदेश संघटक प्रदीप कणसे, पुणे विभागीय अध्यक्ष दिपक वाडदेकर यांचे उपस्थितीत पार पडला.
यावेळी नाईक यांची सांगली जिल्हाध्यक्षपदी यांची तर जिल्हा उपाध्यक्ष राहुल कांबळे विटा यांची नेमणूक करण्यात आली आहे.रोहित पाटील,शिरटे (जिल्हा सचिव),डॉ. किशोर पाटील,सांगली (सांगली शहराध्यक्ष)अवधूत इनामदार,मंगसूळी (कागवाड तालुकाध्यक्ष,जि – बेळगाव)जयवंत पवार, रेठरे हरणाक्ष (वाळवा तालुकाध्यक्ष) उमेश जगपात, कासेगाव (वाळवा तालुका उपाध्यक्ष)
विशाल धस (इस्लामपूर शहर उपाध्यक्ष)
सूरज महाडिक,नेवरी (कडेगाव तालुकाध्यक्ष) सोहिल होनवाड (विटा शहराध्यक्ष) सज्जन शिखरे (विटा शहर उपाध्यक्ष) पदी निवड करण्यात आल्या.
सांगली जिल्हाध्यक्ष उमेश शेवाळे यांनी स्वागत केले तर सूरज महाडिक यांनी आभार मानले.
संभाजी ब्रिगेड पलूस तालुका अध्यक्ष प्रताप पाटील सर, अजित हवालदार, गणेश माळी, वैभव भोसले, तानाजी चव्हाण,संदिप देवकर,परशुराम सरगर,पाडुरंग देवकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.