जत,संकेत टाइम्स : दिड वर्षात म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार विक्रमसिंह सावंत यांना दिले.त्याच बरोबर दोनशे कोटीचा निधी म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी तातडीने मंजूर केले.जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६५ गावांना पाणी मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजनांबाबत आज (ता.२)मुंबई येथे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या उपस्थितीत आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
या बैठकीत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आक्रमकपणे जत तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मांडत सध्याची परिस्थिती व तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या पूर्णत्वासाठी तातडीने निधी मिळणे किती गरजेचे आहे हे स्पष्ट केले.पुरवणी बजेट मध्ये सुद्धा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.जसं जसं काम सुरू होईल तस तसे निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर आमदार विक्रमसिंह सावंत यांनी शेतकऱ्यांसाठी दिवसा ज्यादा दोन तास वीज उपलब्ध करून देण्याचे मागणी केली. यावर मुख्यमंत्री महोदयांनी दिवसा ज्यादा दोन तास वीज उपलब्ध करून देण्याची आश्वासन देत संबंधित विभागाला तसे आदेश दिले.यामुळे जत तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
त्याचबरोबर 143 कोटीच्या निधी वरील स्थगिती उठवण्याची मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली मुख्यमंत्री यांनी ती स्थगिती उठवली असून त्यामुळे जलसंधारण, नगरपालिका, असो विविध विभागाला आता निधी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर जत तालुक्यात शिक्षणाचा बॅकलॉग मोठा असून माध्यमिक,व शिक्षक भरती संदर्भात येथे आठ दिवसात बैठक लावून यावर सविस्तर चर्चा करून तो प्रश्नन मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सावंत यांना दिले .त्याचबरोबर आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यात आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून ते पदे भरण्याची मागणी केली यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला आदेश देत तातडीने पदे भरण्याचे आदेश दिले.बैठकीस पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सांगलीचे पालकमंत्री ना. सुरेशभाऊ खाडे, खा.संजयकाका पाटील, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी तसेच पाटबंधारे विभागाचे व विविध अधिकारी उपस्थित होते.
दीड वर्षात म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन– आमदार सावंतदीड वर्षात म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून यामुळे जत तालुक्याचा पाण्याचा प्रश्नन कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर 143 कोटीच्या निधीवरील स्थगिती उठवण्यात आली असून शेतकऱ्यांसाठी दिवसा दोन तास जादा वीज,आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. शिक्षणासंदर्भात येथे आठ दिवसात बैठक लावून तोही प्रश्न निकाली काढू असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले.
मुंबई येथील बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना म्हैसाळ योजनेबाबत माहिती देताना,यावेळी खा.संजयकाका पाटील,जिल्हाधिकारी डॉ.दयानिधी व अधिकारी उपस्थित होते.