डफळापूरमध्ये विकास कामानां ऐतिहासिक निधी खर्च(भाग 2)

0
डफळापूर,संकेत टाइम्स : गाव भागाला पाणी पुरवठा करणारी पाणी योजना बऱ्याच वर्षापासून रखडलेली राष्ट्रीय पेयजल योजना आम्ही सातत्याने पाठपुरावा करून कार्यान्वित केली आहे. या योजनेचे किचकट असणाऱ्या गावातील नागरिकांच्या घरापर्यत नळ जोडण्या देण्याचे काम आम्ही अनेक वाद,अडचणी मिटवून पुर्ण केले.परिणामी नागरिकांना आता मुबलक पाणी पुरवठा होत आहे. पाणी पुरवठा अडचणी दूर करण्यासाठी जूनी योजना व पेयजल योजनेचे लिकेज,पाणी वाहक पाईपलाईन अगदी आमचे जेसीबी,चारचाकी वाहने लावून स्व:पुढे उभे ही कामे केली आहेत.

 

 

निवडणूपुर्व जाहीर नाम्यात बोलल्याप्रमाणे संरपच मानधन सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहे.अंगणवाडी,सेविका,आशा वर्कर यांना भाऊबीज दिली.तसेच कोरोना भत्ता दिला.गावातील महिलासाठी जागृत्तीसाठी मेळावा घेतला.माजी सैनिकांचा सन्मान केला.ही सर्व कामे करत असताना पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य,जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब,माजी आमदार विलासराव जगताप,विद्यमान आमदार विक्रमसिंह सांवत,खासदार संजयकाका पाटील यांची मदत झाली.

 

 

अनेक अडचणीनंतर ऐतिहासिक असणारा वेशीजवळील बुरूज बांधण्याचे काम पुर्ण केले.तसेच बसस्टँड नजिकचे सिध्दनाथ मंदिराचे बांधकाम सुरू करून लोकवर्गणीतून बांधण्याचे स्वप्न पुर्ण केले आहे.मिळालेल्या कालावधीत मोठ्या प्रमाणात विकास कामे करून आम्ही उपलब्धता सिध्द केली आहेत.काही कामे मंजूर असूनही काही अडचणीमुळे पेन्डींग राहील,त्याबद्दल खेद आहे,असेही श्रीमती बालिकाकाकी चव्हाण व प्रताप चव्हाण यांनी सांगितले.
५० लाखाचा निधी शिल्लक 
गत पाच वर्षात विकासकामांना आम्ही प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त निधी खेचून आणला आहे. अद्यापही ५० लाख रूपयाचा निधी शिल्लक आहे.त्यातून रस्त्याची कामे नियोजित आहेत.तांत्रिक अडचणी आल्याने आम्ही ती करू शकलो नसल्याचेही संरपच श्रीमती चव्हाण यांनी सांगितले.
प्रंसगी स्व:खर्चातून केली विकास कामे
गावातील विकास कामे करताना शासकीय निधी शिवाय स्व:ताचे जेसीबी,ट्रँक्टर,चारचाकी वाहने लावून कामे केली.जवळपास १६ लाख रूपयाची कामे स्व:खर्चाने केल्याचा दावा संरपच बालिकाकाकी चव्हाण यांनी केला.त्यात कोळी वस्तीवर शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरमीकरण(१ लाख),भोसले वस्तीवर मुरूम टाकणे(.५० लाख),डफळापूर-अनंतपूर रस्ता ते राहुल पाटील घरापर्यत रस्ता(५ लाख),सोनार ओढा ते गुरूबसू माळी घरापर्यत मुरमीकरण(३ लाख),काळेशिवार पुल(.५० लाख),बस स्टँन्ड पाठीमागील कचरा उचलणे(१.०० लाख),महाजन हॉटेल समोरील(मिरवाडकडे जाणारा रोड) अतिक्रमण काढून डांबरीकरण केले(५ लाख)

 

अनेक वर्षापासून असणारा पाणी प्रश्न सोडविला
गावात आम्ही सत्तेवर येण्याअगोदर पाणी प्रश्न होता.नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत होते.मात्र गत ५ वर्षात सातत्याने प्रधानमंत्री पेयजल योजना,जूनी योजनेच्या अडचणी दूर केल्या.पाणी योजना पुर्ण होऊन ग्रामस्थांना मुबलक पाणी देण्याला प्राधान्य दिले.पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत.ते रस्ते मजबूत करण्यासाठी निधी उपलब्ध केला आहे.टेंडरही झाले आहे,काम प्रगतीपतावर आहे.ग्रामस्थांच्या काही अडचणी व कोरोनामुळे हे काम होऊ शकलेले नाही.आमच्या काळात पाणी योजना पुर्ण होऊन नागरिकांना मुबलक पाणी देण्याचे काम आम्ही केल्याचेही श्रीमती चव्हाण यांनी सांगितले.
Rate Card
गावच्या इतिहासात प्रथमच अनेक योजनांना   निधी
शासनाच्या काही योजना प्रथमच डफळापूरमध्ये ग्रामविकासची २५ /१५,प्रधानमंत्री /मुख्यमत्री ग्रामसडक योजना,नाबार्ड (पूल),अल्पसंख्याक योजना अशा योजनेतून गावच्या इतिहासात पहिल्यांदांच निधी आणून कामे केली आहेत.
ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न
अनेक वर्षापासून पडझड झालेला डफळापूरचा ऐतिहासिक वारसा जपत वेशी नजिकच्या बुरूजाचे बांधकाम करण्यात येत आहे. त्याशिवाय स्टँड परिसरातील अतिक्रमणे काढून रस्ता डांबरीकरण केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.