डफळापूरमध्ये सर्व वार्डात विकास योजना पोहचल्या(भाग 3)

0

 

डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर मोठे गाव असल्याने वार्ड संख्याही मोठी आहे.या सर्व ६ वार्डात आम्ही समान निधी विभागून ग्रामस्थांच्या गरजेची विकास कामे करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही संरपच श्रीमती बालिकाकाकी चव्हाण यांनी सांगितले.

 

वार्ड नं.१
रस्ते कॉक्रीटीकरण,बंदिस्त गटार,मुरमीकरण
वार्ड नं.१
गावातील महत्वाचा असणारा वार्ड नं.१ या वार्डातील छत्रे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरमीकरण करून पावळ्यात नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर केल्या.येथे मुरूमीकरण,क्रॉक्रीटीकरण(३+१ लाख) अशी कामे झाली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये रस्ता कॉक्रीटीकरण (८लाख),पुर्ण केले.वाचनालय ते हनुमान मंदिर रस्ता कॉक्रीटीकरण(१० लाख),बंदिस्त कटर(५ लाख)या कामामुळे नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.ग्रा.पं.सदस्य सौ.पवित्रा हताळे,मुरलीधर शिंगे,विठ्ठल छत्रे यांच्या विशेष प्रयत्नातून ही कामे झाली आहेत.
वार्ड न.२
रस्ते मजबूतीकरण, पूल ४६ लाखाचा निधी खर्च
वार्ड नं.२ हा १ प्रमाणे विकासापासून लांब होता.या वार्डातील अनेक वस्त्यांना कच्चा रस्ता, ओढापात्रे ओलाडून जावे लागत होते.यातून सुटका करण्याच्या उद्देशाने डफळापूर अंनतपूर रस्ता ते पाटबंधारे ऑफिस पर्यंत डिपीडीसी (२५ लाख) योजनेतून डांबरीकरण केले.सोनार ओढ्यावर पूल (५ लाख)बांधला.सोनार ओढा ते गुरूबसू माळी घर रस्ता मुरमीकरण (३ लाख)केले.डफळापूर अनंतपूर रोड ते ग्रा.प.सदस्य राहुल पाटील घरापर्यत मुरमीकरण(५ लाख) केले.महेश डोंगरे घर ते डफळापूर रस्ता गटारी(९ लाख) बांधल्या.ग्रा.पं.सदस्य सौ.विजया माळी,सौ.सतिशा चव्हाण, राहुल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून ही कामे झाली आहेत.
वार्ड नं. ३
बहुउद्देशीय हॉल,नाना-नानी पार्क ७७ लाखाचा निधी
वार्ड नं.३ हा गावाभागात जास्त लोकसंख्या असलेले वार्ड आहे.त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता डांबरीकरण(१० लाख) केला.नाना-नानी पार्क(१०लाख),बहुउद्देशीय हॉल(मंगल कार्यालय)(३२लाख) बांधले ज्यामुळे भविष्यात लग्न,साखरपुडे,मिटिंग,सांस्कृतिक कार्यक्रम  घेणे शक्य झाले आहे.काळेशिवार रस्ता डांबरीकरण (२० लाख)केला.डफळापूर अनंतपूर रस्ता ते राजू महाजन दुकान ते गावामध्ये जाणारा रस्ता पेव्हिंग ब्लॉक(५ लाख)बसविले.ग्रा.पं.सदस्य बाबासाहेब माळी,सुनिल गायकवाड,सौ.रेश्मा शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून ही कामे झाली आहेत.
Rate Card
वार्ड नं.४
दोन डांबरीकरण रस्ते,बंधिस्त गटारी,ब्लॉक रस्ते
वार्ड नं.४ मध्ये सर्वाधिक विकास कामे झाली आहेत.त्यात मुख्यमंत्री सडक योजनेतून जायओघळ रस्ता (२ कोटी)केला.डफळापूर-अंकले रस्ता (४ कोटी)पुर्ण केला.
अंकले रस्ता ते धिरज पाटील घराकडे जाणारा रस्ता मुरमीकरण (३.५० लाख)केले.
संकपाळ गल्लीमध्ये बंधिस्त गटार व पेव्हिंग ब्लॉक(२० लाख) बसविले.ग्रा.प.सदस्य देवदास चव्हाण,सौ.सावित्री दुगाणे स्व.कमल संकपाळ यांच्या विशेष प्रयत्नातून ही कामे झाली आहेत.

 

वार्ड क्रं.५
शौचालय,बंधिस्त गटार,सिडीवर्कमुळे मोठी सोय
गाव भाग,स्टँड परिसर असणाऱ्या या वार्ड सर्वाधिक विकास कामे केली आहेत.पाटोळे गल्लीमध्ये पेव्हिंग ब्लॉक (१२ लाख)बसविले.पाटोळे गल्ली बंधिस्त गटार (५ लाख),म्हेत्रे वस्ती ओढापात्रावर सिडीवर्क(५लाख),सुतार कोळी वस्ती रस्त्यावर सिडीवर्क(३ लाख) केले.त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मोठी सोय झाली आहे.
बस स्टँड परिसरात पेव्हिंग ब्लॉक (३ लाख),बस स्टँड मागे शौचालय(५ लाख),जत रोड ते संजू माळी घर ते प्रमोद परूळेकर ते दत्तू नाईक घरापर्यत मुरमीकरण (५ लाख) केले.याशिवाय बसस्टँड चौकात अतिक्रम काढून डांबरीकरण केले.सिध्दनाथ मंदिराचा लोकवर्गणीतून जिणोद्वार करण्याचे काम सुरू आहे. बाजार पेठेत,बँक ऑफ महाराष्ट्र, बुवानंद मंदिर,प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता,संकपाळ गल्ली,संकपाळ वस्ती,आंबेडकर नगरमध्ये हायमास्ट बसविले.ग्रा.पं.सदस्य प्रताप चव्हाण, जयश्री बोराडे,मंगल गावडे यांच्या विशेष प्रयत्नातून ही कामे झाली आहेत.
वार्ड नं.६
ऐतिहासिक बुरूज बांधून इतिहास जपला
ऐतिहासिक महत्व असलेली वेस व बुरूज असणारा हा वार्ड विकासकामातून चांगला केला. त्यात फकीरवाडा ओढापात्रावर पुल (१० लाख)बांधला,नंदिवाले वस्तीवर पेव्हिंग ब्लॉक (३ लाख),नंदिवाले वस्तीवर मोटार जोडणी,टाकी बसवून पिण्याच्या पाण्याची सोय(१.५० लाख) केली.इतिहास कालीन बुरूज(९ लाख) बांधला.मिरवाड रस्त्यावर दिपक कांबळे घरापाठीमागे नाबार्ड योजनेतून(६० लाख) पूल बांधला.बस स्टँड ते भानूदास पाटील घरापर्यत मुरमीकरणडांबरीकरण(५३ लाख) केले.हनुमान मंदिर ते अंगणवाडी रस्त्यालगत पेव्हिंग ब्लॉक (३लाख) बसविले.ग्रा.पं.सदस्य अजिज खतीब,मालन गडदे यांच्या विशेष प्रयत्नातून ही कामे झाली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.