तासगाव : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जगात काय नव तंत्रज्ञान आले आहे याची माहिती मिळाली तरच तो आधुनिक शेती पिकवू शकेल. महेश खराडे यांच्यासारख्या शेतकरयांविषयी तळमळ असणाऱ्या व्यक्तिकडून याचे आयोजन होत आहे. हे कौतुकास्पद आहे. शिवार कृषी प्रदर्शन हे शेतकरयांसाठी दिशादर्शक आहे असे उद्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी तासगावात उदघाटन प्रसंगी काढले. तर शेतकऱ्यांनी पिकवण्यापेक्षा विकायला शिकलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले. शिवार फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी याचे आयोजन केले आहे.
यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले शेती कायम तोट्याची तरीही शेतकरी या मातीशी कधी बेईमान होत नाही. बाजारपेठ, रोगराई, बदलतं वातावरण, कामगार, कर्ज यांसह अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत. मात्र बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरण गरजेचं आहे. गरजेपेक्षा जास्त पिकवायच नाही आणि विकतचे तेच पिकवण्याचं धोरण शेतकऱ्यांनी अवलंबण्याची गरज आहे. शेंद्रीय शेतीने चवीनं खाणाऱ्यांचा प्रश्न सुटेल पण भूक म्हणून खाणाऱ्या माणसांचं काय असा सवाल त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या डोक्यातुन जोपर्यंत जात धर्म,पक्ष, नेता जात नाही तोवर तुमाला कोण वाचवू शकत नाही. चळवळीला तुम्ही साथ देत नाय जरा लाजा वाटू दया असा उद्विन्ग सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांनी दबावगट केला तरच तुमचे प्रश्न मिटतील व सुटतील शेतकऱ्यांना त्यांची बाजू घेणारे नेते तयार करावे लागतील अन्यथा भविष्यात तुमचे कुत्र हाल खाणार नाही असे शेट्टी म्हणाले.
प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान मिळते यामुळे तो आधुनिकतेची कास धरत आर्थिक प्रगती होते. कृषी विद्यापीठांनी बदलत्या वातावरणात तग धरतील अशी बियाणे निर्माण करावीत. निसर्ग बदललाय.तेजा अभ्यास करून तूमी बदलायला पाहिजे. ऊस सोडला तर यंदा सारया पिकांची वाट लागली असल्याची सांगत निसर्गाच्या नोंदी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागच्या शेतकऱयांना शिवारच्या माध्यमातून जगाच तंत्रज्ञान तासगावात आले असे सांगत महेश खराडे यांचेही त्यांनी कौतुक केले. व जगभरात नविन काय शोध लागला आहे याच्या माहितीसाठी अशा कृषी प्रदर्शनाची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना महेश खराडे म्हणाले की शिवार हे कृषी प्रदर्शन शेतकरी व शेतकरयांच्यासाठी गेली ९ वर्षे भरवत आहे. नवे तंत्रज्ञान मिळावे या हेतुनेच याचे आयोजन केले असल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रदर्शनात या प्रदर्शनात राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय कंपन्याचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. यात खते ,बी बियाणे ,औषधे,औजार ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. याशिवाय विविध कंपन्याची वाहने आहेत. गृहपयोगी वस्तुचेही स्टॉल सहभागी आहेत.
त्याचबरोबर शेतकरी बाजाराचेही आयोजन करण्यात आले आहे यामुळे शेतकऱ्यांना त्याचा कोणताही शेतीमाल या ठिकाणी आणून विकता येणार आहे. तांदूळ महोस्त्वाचेही आयोजन केले आहे. तर खाद्य संस्कृतीही जोपासली आहे. नुसती मोर्चे आंदोलने आम्ही करणार नाही तर शिवार फार्मर कंपनी मार्फत आम्ही शेतकऱयांचा माल चांगल्या दराने खरेदी करत आम्ही दलालांची साखळी मोडण्याचा प्रयत्न करत आहे. राजू शेट्टी यांच्यामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. नाक दाबल्याने आता तेंची तोंड उघडत आहेत. ऊस परिषदेप्रमाणे तासगावात द्राक्ष व बेदाणा परिषद व जात येथे डाळिंब परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उद्योजक गिरीश चितळे यांनी भविष्यात हे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पद्धतीचे होईल असे सांगितले. प्रकाश अवताडे यांनीही मार्गदर्शन केले यावेळी कृषी विभागाचे बसवराज बिराजदार, कृषी अधिक्षक प्रकाश सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील वसंत कृषीचे अविनाश पाटील चंद्रकांत खरमा ते बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी स्वाभिमानी अजित हलीगले महेश जगताप, अशोक खाडे, गुलाब यादव दामाजी दुबाल राजेंद्र माने शशिकांत माने , बसवेश्वर पावटे , भुजंगराव पाटील ,, शिवाजी पाटील, सुरज पाटील, दामाजी डूबल, प्रकाश देसाई बाबुराव शिंदे राजेंद्र पाटील संजय खोळखुंबे आदींसह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
लूटणाऱ्यांना ऊस घालू नका: राजू शेट्टी
सांगलीच्या शेतकऱयांनी जरा हालचाल खराय शिकलं पायजे. साखर सम्राट मस्तीला आलेत. तुमाला लुटाय लागलेत. अशा हारामखोरांना ऊस घालू नका हिशोब ठेवा. कारखान्याला वजन करून ऊस घाला. खुळ्यागत शिती करून दूसर्यासाठी शेती करायची बंद करा असे आवाहन शेट्टी त्यांनी शेतकऱ्यांना केले.