डफळापूर : यश म्हणजे जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोणातून बघणे वाईट गोष्टीचा त्याग करणे जीवनाच्या वाटचालीत अडचणीना संकटांना समस्याला समोरं जाण,श्रम, बुद्धीमता, माहिती,कल्पकता त्यातून मार्ग काढणे म्हणजे यशाचे शिखर गाठणे आहे,असे मत कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे सहा पोलीस इन्सपेक्टर व ॲथलेटिक्स राष्ट्रीय खेळाडू ,गिर्यारोहक श्री.विजय घोलप यांनी केले.
ते राजे विजयसिंह हायस्कूलच्या मरगुबाई देवस्थानाच्या शिवार फेरी व वनभोजन निमित्त प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक श्री.नदाफ सर होते.
श्री घोलप यांनी विद्यार्थ्यी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाना उतर देताना म्हणाले की,पालकांनी लहान मुलांना गाडी चालविण्यास देऊ नये व मुलांनी ही गाडीसाठी हट्ट धरु नये.यामुळे अपघात होण्याची शक्यता असलेने हे टाळावे. संस्कृतीक कार्यक्रमात सर्वांनी गाण्याचा आनंद घेतला.७०० मुलांची शिक्षकांची वनभोजनाची व्यवस्था शिवारा मध्येच गावातील सामाजिक कार्यकर्ते मालोजीराजे भोसले यांनी केली.शिवार फेरीत बी आर सी विषयतज्ञ सुरेंद्र सरनाईक स्कूल कमिटीचे अध्यक्ष संतोष बंडगर,भारत गायकवाड,धनाजी चव्हाण वसंत माळी,कॅप्टन रामचंद्र भोसले,कॉ. हणमंत कोळी,व्यापारी प्रविण कोष्टी मनोज पोळ, काळे सर,राहूल मसणे बाळासाहेब गायकवाड,बल्लोळ सर मनिषा माळी, श्रीम.जाधव मॅडम, सुनंदा ठवरे,श्रीम चव्हाण मॅडम,शिंदे सर,अथणी सर,श्री.कांबळे सर,हुले सर,पाटील सर, शरद कांबळे आदी उपस्थित होते.श्री मोहिते सर व राठोड सर यांनी सुत्रसंचालन,प्रास्ताविक व आभार मानले.
डफळापूर : राजे विजयसिंह डफळे हायस्कूलचा वनभोजन कार्यक्रम संपन्न झाला.