जत,संकेत टाइम्स : सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावरून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू आहेत.या पा या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्याचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत, जत तालुका संपर्कप्रमुख श्री योगेश जानकर व सांगली जिल्हा प्रमुख श्री आनंदराव पवार जत तालुका दौरा करणार आहेत.सोमवार, दि. ५ डिसेंबर रोजी हा दौरा होत आहे.सीमावर्ती भागातील नागरिकाशी ते संवाद साधणार आहेत तसेच तिकोंडी व उमदी व माडग्याळ ग्रामस्थांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. माडग्याळ, व्हसपेठ, तिकोंडी या तलावांची पाहणीही मंत्री महोदय करणार आहेत.
जत तालुका दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.सोमवार दिनांक ५ डिसेंबर २०२२सकाळी ८.३० वा. : हेलिकॉप्टरने मुंबईहून गुड्डापूर येथे आगमन व श्री दानम्मादेवी दर्शनसकाळी: १०.०० वा माडग्याळ तलाव पाहणीसकाळी: १०: ३० तिकोंडी २ तलाव पाहणी व तिकोंडी ग्रामपंचायती समोर ग्रामस्थांची बैठकसकाळी १२: ०० वा. उमदी येथील श्री भाऊसाहेब महाराज मठास भेट व ग्रामस्थांची बैठकदुपारी १:३० गुड्डापूर येथे पत्रकार परिषददुपारी २:३० वा हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना