मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यामुळे आशेचा किरण | उद्योग व्यवसायाला चालना मिळणार !
जत,संकेत टाइम्स : कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या जत तालुक्या बाबतच्या विधानानंतर महाराष्ट्रात खळबंळ उडाली आहे.परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी गांभिर्याने लक्ष घालत जतला विकास योजनासाठी मोठ्या निधीची घोषणा केली आहे. त्याशिवाय मराठी शाळा,पाणी पुरवठा योजना,रस्ते,उद्योगासह जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज उद्योग मंत्री उदय सामंत सह बाळासाहेबाच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख योगेश जानकर जत दौऱ्यावर येत आहेत.सकाळी गुड्डापूर येथून त्यांच्या दौऱ्याची सुरूवात होणार आहे. माडग्याळ,तिकोंडीसह सीमावर्ती भागातील लोकांशी ते संवाद साधणार आहेत.त्याशिवाय म्हैसाळ योजनेच्या कामाची पाहणी करणार आहेत.

रस्ते, पाण्यासह मोठे उद्योगाची गरजजत तालुक्यात कोरडवाहू जमिनीचे मोठे क्षेत्र आहे.मोठ्या संख्येने पवनऊर्जा निर्माण होत आहे. त्याशिवाय जत तालुक्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग गेल्याने वाहतूक सुविधा निर्माण झाली आहे. मोठ्या संख्येने कुशल,अकुशल मनुष्यबंळ तालुक्यात आहे.सरकारने घोषणा केल्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तालुक्यात मोठे उद्योग आणण्याची गरज आहे.
३० किलोमीटवर आंतरराष्ट्रीय विमानतळलगतच्या विजापूरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारत आहे.त्यामुळे उद्योगपतीना जाण्या-येण्याचे सोय होणार आहे.जागतिक पातळीवरील मोठे उद्योगांचीही येथे उभारणी शक्य आहे.फक्त राजकीय इच्छाशक्ती,जनतेचा दबाव,सरकारचे प्रयत्न महत्वाचे आहेत.