महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सोमवारी जत तालुका दौऱ्यावर | मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सिमाभागातील गावातील समस्यांचा आढावा घेणार

0
जत,संकेत टाइम्स : सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावरून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू आहेत.या पा या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्याचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत, जत तालुका संपर्कप्रमुख श्री योगेश जानकर व सांगली जिल्हा प्रमुख श्री आनंदराव पवार जत तालुका दौरा करणार आहेत.सोमवार, दि. ५ डिसेंबर रोजी हा दौरा होत आहे.सीमावर्ती भागातील नागरिकाशी ते संवाद साधणार आहेत तसेच तिकोंडी व उमदी व माडग्याळ ग्रामस्थांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. माडग्याळ, व्हसपेठ, तिकोंडी या तलावांची पाहणीही मंत्री महोदय करणार आहेत.
Rate Card
जत तालुका दौऱ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
सोमवार दिनांक ५ डिसेंबर २०२२
सकाळी ८.३० वा. : हेलिकॉप्टरने मुंबईहून गुड्डापूर येथे आगमन व श्री दानम्मादेवी दर्शन
सकाळी: १०.०० वा माडग्याळ तलाव पाहणी 
सकाळी: १०: ३० तिकोंडी २ तलाव पाहणी व तिकोंडी ग्रामपंचायती समोर ग्रामस्थांची बैठक 
सकाळी १२: ०० वा. उमदी येथील श्री भाऊसाहेब महाराज मठास भेट व  ग्रामस्थांची बैठक 
दुपारी १:३० गुड्डापूर येथे पत्रकार परिषद 
दुपारी २:३० वा हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.