मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यामुळे आशेचा किरण | उद्योग व्यवसायाला चालना मिळणार !

0
4

जत,संकेत टाइम्स : कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या जत तालुक्या बाबतच्या विधानानंतर महाराष्ट्रात खळबंळ उडाली आहे.परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी गांभिर्याने लक्ष घालत जतला विकास योजनासाठी मोठ्या निधीची घोषणा केली आहे. त्याशिवाय मराठी शाळा,पाणी पुरवठा योजना,रस्ते,उद्योगासह जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज उद्योग मंत्री उदय सामंत सह बाळासाहेबाच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख योगेश जानकर जत दौऱ्यावर येत आहेत.सकाळी गुड्डापूर येथून त्यांच्या दौऱ्याची सुरूवात होणार आहे. माडग्याळ,तिकोंडीसह सीमावर्ती भागातील लोकांशी ते संवाद साधणार आहेत.त्याशिवाय म्हैसाळ योजनेच्या कामाची पाहणी करणार आहेत.

 

सर्वात महत्वाचे म्हणजे जत तालुक्यात मोठे उद्योग आणता येतील का ? या भागात तसे पुरक वातावरण आहे का यांचाही आढावा मंत्री सामंत घेणार आहेत.
कायम दुष्काळी,राजकर्त्याचे दुर्लक्ष झालेल्या या तालुक्याकडे स्वांतञ्याच्या पंच्चाहत्तरी नंतर विकासाबाबतचा आशेचा किरण निर्माण झाला आहे.

 

मुळात जत विकासापासून कोसो लांब राहिला हि वस्तूस्थिती आहे.कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती असणाऱ्या या भागातील जनतेच्या मवाळ व कष्टाळू स्वभावामुळे कधीही उद्रेक झाला नव्हता.यापुर्वी तीव्र दुष्काळात या भागातील ४० गावांनी आम्हाला पाणी द्या,अन्यथा कर्नाटकात जाण्याचा दिलेला इशारा याव्यतिरिक्त शांतेत जीवन जगणाऱ्या येतील जनतेच्या संयमाचा आंत सोयीचे राजकारण करणाऱ्या राजकर्त्यांनी पाहिला., मात्र गेल्या महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटकात सामील होतील असा बॉम्ब टाकला.यानंतर मात्र संपुर्ण महाराष्ट्र खडबडून जागा झाला.राज्यभर हा विषय सोयीने पुढे केला गेला.महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढल्याने अखेर मुख्यमंत्री अक्शन मोडवर आले आहेत.

 

त्यांनी जतचे आमदार,खासदार,पालकमंत्री विविध विभागाचे अधिकारी यांची बैठक घेत म्हैसाळ योजनेसह पाणी योजनासाठी तब्बल २१०० कोटीच्या निधी देण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय दिड वर्षात योजना पुर्ण करण्याचे आदेश दिलेत.जत तालुक्यातील मराठी शाळा,शिक्षक,आरोग्य विभागातील रिक्त जागा,रस्तेसह उद्योग उभारणीसाठी सरकार प्रयत्न करेल अशी घोषणा केली आहे.
आज जत तालुक्यात उद्योग मंत्री उदय सामंत मँरेथान दौरा करणार आहेत.या भागात कोणता उद्योग आणता येईल यांचाही अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे ऊसतोड मजूराचा तालुका हि प्रतिमा बदलणार असा विश्वास निर्माण झाला आहे. जत तालुक्यात शेतपुरक, वाहन उत्पादक,सीमेंट,स्टिल उद्योगासारखे मोठे कारखाने सुरू करण्यास वाव आहे.मुबलक जागा,विज,पाणीसह आता लगत राष्ट्रीय महामार्गही झाल्याने उद्योग उभारणीस वाव निर्माण झाला आहे.त्याशिवाय अन्य छोटे-मोठे उद्योग उभारणीसाठी पंचताराकिंत एमआयडीसी ही उभारण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. तरचं येथील बेरोजगार तरूणांच्या हाताला काम मिळेल,अन्यथा पुन्हा मोठ्या सुविधा देणाऱ्या कर्नाटकमध्ये जाण्यासाठी दबाव वाढत राहिल.
रस्ते, पाण्यासह मोठे उद्योगाची गरज
जत तालुक्यात कोरडवाहू जमिनीचे मोठे क्षेत्र आहे.मोठ्या संख्येने पवनऊर्जा निर्माण होत आहे. त्याशिवाय जत तालुक्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग गेल्याने वाहतूक सुविधा निर्माण झाली आहे. मोठ्या संख्येने कुशल,अकुशल मनुष्यबंळ तालुक्यात आहे.सरकारने घोषणा केल्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तालुक्यात मोठे उद्योग आणण्याची गरज आहे.
३० किलोमीटवर आंतरराष्ट्रीय विमानतळ
लगतच्या विजापूरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारत आहे.त्यामुळे उद्योगपतीना जाण्या-येण्याचे सोय होणार आहे.जागतिक पातळीवरील मोठे उद्योगांचीही येथे उभारणी शक्य आहे.फक्त राजकीय इच्छाशक्ती,जनतेचा दबाव,सरकारचे प्रयत्न महत्वाचे आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here