जत सिमाभागातील समस्या सकारात्मकपणे सोडविल्या जातील ; उद्योगमंत्री उदय सामंत
जत (सांगली) तालुक्यातील सीमाभागातील उमदी परिसरातील गावांची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली. या भागातील नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सकारात्मकपणे सोडविल्या जातील, असा विश्वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी, आमदार विक्रमसिंह सावंत, संपर्कप्रमुख योगेश जानकर, जिल्हाप्रमुख आनंद पवार व संबंधित उपस्थित होते.
