फॅबटेक स्कूलचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत यश

0
सांगोला:  फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत निवड. रंगोत्सव सेलिब्रेशन ” राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धा ” यामध्ये हस्ताक्षर
स्पर्धा व रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धा मुंबई येथे ऑगस्ट महिन्यात घेण्यात आल्या होत्या.
या कला स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व आपल्या मधील आंतरिक गुणांना वाव दिला. यातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता व वेगळेपणा दिसून आला. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील  हस्ताक्षर स्पर्धेमध्ये दोन विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मिळाले. दहा
Rate Card
विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व पाच विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल तसेच प्रमाणपत्र मिळाले आहे.कृतिशील प्राचार्य म्हणून शाळेचे प्राचार्य सिकंदर पाटील यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तर कला भूषण म्हणून शाळेचे कलाशिक्षक अविनाश जावीर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.