जत : जत पोलीस ठाणे हदीतील गुन्हेगार विकास विलास दुधाळ टोळीस पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी सांगली व सोलापूर या दोन जिल्ह्यातून २ वर्षे कालावधीकरिता तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.टोळी प्रमुख विकास विलास दुधाळ, (वय २६, रा. अंकले),
श्रीकांत युवराज पाटील, (वय २५), लालासो ऊर्फ समाधान युवराज पाटील, (वय २२), अजय ऊर्फ अजितराव रावसाहेब दुधाळ, (वय २२), भारत ऊर्फ अमोल विलास दुधाळ,(वय २३), रविंद्र भाऊसो दुधाळ, (वय २५,सर्व रा.अंकले ता. जत) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.या टोळीविरुद्ध २०१८ ते २०२२ मध्ये जत पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये टोळीची दहशत रहावी म्हणून बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्यारानिशी इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेवून शारिरीक संबध ठेवणे,बेकायदेशीर जमाव जमवून रस्त्यात अडवून शिवीगाळ,मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी देणे, असे शरिराविरुद्धचे गंभीर स्वरुपाचे ०७ गुन्हे या टोळीतील सदस्यांवर दाखल आहेत.
त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पोलीस निरीक्षक, जत पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाचे पोलीस अधीक्षक, सांगली यांनी अवलोकन करुन,तत्कालीन चौकशी अधिकारी पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल तसेच
प्रस्तावाचे सुनावणी दरम्यान दाखल गंभीर गुन्हा त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन, त्यांची सलग सुनावणी घेऊन टोळीतील सहा जणांना सांगली,सोलापूर या दोन जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरिता तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.ही कारवाई पोलीस अधिक्षक, डॉ.बसवराज तेली, अपर पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, जतचे निरीक्षक राजेश रामाघरे, सिध्दाप्पा रुपनर, दिपक गट्टे, राज सावंत,वनिता सकट यांनी केली.