डफळापूर,संकेत टाइम्स : डफळापूर (ता.जत)ग्रामपंचायत निवडणूकीत बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण व पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पँनेलचे थेट संरपच पदाचे उमदेवार म्हणून अखेर जेष्ठ नेते सुभाषराव गायकवाड निश्चित झाले आहेत.महत्वपूर्ण बैठकीनंतर पँनेलमधून अर्ज भरलेल्या अन्य उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने अखेर सुभाषराव गायकवाड हेच थेट संरपच पदासाठी लढणार आहेत.
