फॅबटेकच्या विद्यार्थ्यांनी लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद

0

सांगोला : फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने शैक्षणिक सहल आयोजित केली होती. शैक्षणिक सहल म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनमुराद आनंदाचा,उत्सहाचा दिवस.अभ्यासेत्तर उपक्रम म्हणून शालेय सहलीचे आयोजन केले जाते. निसर्गरम्य स्थळे, प्रेक्षणीय स्थळे ,धार्मिक स्थळे, औद्योगिक स्थळे,वस्तू संग्रहालय, ऐतिहासिक वास्तू यांचे प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता यावेत असा सहल आयोजित करण्यामागचा उद्देश असतो.फॅबटेक स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांच्या प्रेरणेतून शैक्षणिक सहल आनंदात व उत्साहात पार पडली. इयत्ता पहिली ते पाचवी या गटाची शैक्षणिक सहल अकलूज येथे आयोजित केली होती.विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सहलीला जाण्याचा उत्साह विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.सकाळी साडेसात वाजता सहलीला जाणाऱ्या गाड्यांची पूजा पालकांकडून करण्यात आली व सहलीसाठी प्रस्थान झाले.

 

अकलूज येथील ग्रामदेवता अकलाई मंदिर, आनंदनगर येथील निसर्गरम्य वातावरणातील श्री गणेश मंदिर येथे भोजन करून शिवसृष्टी व शिवकालीन प्रसंग किल्ले बुरुज विद्यार्थ्यांनी पाहीले. शिवसृष्टी मधील शिवकालीन घटना प्रसंग मुलांनी उत्सुकतेने पाहिले,यानंतर शिवामृत या ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ कसे तयार होतात हे पाहीले व अनेक प्रश्न व माहिती विद्यार्थ्यांनी शिवामृत कर्मचाऱ्यांना विचारली. सहलीत विविध प्रकारची गाणी मजामस्ती करत मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. सहलीसाठी संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे व प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांचे सहलीसाठी मार्गदर्शन मिळाले.सहलीसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. ही स्पर्धा संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री.अमित रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी संपन्न झाली.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.