बेळूंखीत युवाक्रांती ग्रामविकास पँनेलचा बोलबाला

0

डफळापूर,संकेत टाइम्स : बेंळूखी ग्रामपंचायत निवडणूकीत युवाक्रांती ग्रामविकास परिवर्तन पँनेलच्या सक्षम उमेदवारांचा विजय निश्चित असल्याची भावना पँनेल प्रमुखांनी व्यक्त केली असून गावच्या विकास हा आमचा अजेंडा निश्चित करण्यात आला आहे.रविवारी पँनेलच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. यांचवेळी भव्य रँलीचे काढली जाणार आहे.

 

बेंळूखीचे पहिले लोकनियुक्त संरपच स्व.वसंतराव चव्हाण हे या पँनेलचे प्रेरणास्थान आहे.स्वच्छ, लोकहित‌ जणारे चव्हाण यांची कारकीर्द आजही लोकांना भावणारी आहे.त्यांच्या पत्नी यावेळी युवाक्रांती पँनेलच्या थेट संरपच पदाच्या उमेदवार आहेत.त्यामुळे प्रथमपासूनच त्यांना मोठा पांठिबा मिळत आहे.

 

Rate Card

युवाक्रांती युवक,जेष्ठ,वयोवृद्ध, महिला असे पँनेलचे कार्यकर्ते घर टू घर प्रचार यंत्रणा राबवत आहेत.
पँनेलचे उमेदवार असे,थेट संरपच सुनीता वसंत चव्हाण,वार्ड १ : सागर दिलीप चव्हाण, कुसूम गुलाब चंदनशिवे,यशोदा जालिंदर सुतार,वार्ड २ : अशोक विठोबा चव्हाण, मंगल शिवाजी माळी,मंगलाबाई शिवाजी कदम,वार्ड ३ : सिताराम सत्याप्पा माळी,रेश्मा संतोष चंदनशिवे,अरूण भाऊसाहेब शिंगाडे

विकास हाच अजेंडा

पहिले लोकनियुक्त संरपच वसंतराव चव्हाण यांच्या स्वच्छ, पारदर्शी कारभार आदर्श मानत आम्ही लोकांचे हित,गावचा विकास हाच अंजेडा घेऊन निवडणूक लढवित आहोत,मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन सुनीता चव्हाण यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.