अप्पर तहसील कार्यालय,माडग्याळ तालुका करण्यासाठी साथ द्या ; सौ.अनिता माळी | माडग्याळमध्ये जय हनुमान ग्रामविकास शेतकरी पॅनेलने प्रचारात आघाडी 

0
माडग्याळ,संकेत टाइम्स : माडग्याळ,(ता.जत)येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत जय हनुमान ग्रामविकास शेतकरी पॅनेलने प्रचारात आघाडी घेतली आहे.प्रचाराचा शुभारंभ झाल्यापासून सर्व उमेदवारांनी घर टू घर प्रचार सुरू केला आहे.शुक्रवार आठवडा बाजाराचा दिवस असल्याने गावातून रॅली काढण्यात आली.बाजारातील व्यापारी,ग्राहकांना वॉलेट पेपर देऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार सौ.अनिता महादेव माळी तसेच सर्व वार्डातील उमेदवार आणि पॅनेल प्रमुख तसेच मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पँनेलच्या थेट संरपच पदाच्या उच्चशिक्षित उमेदवार,त्याशिवाय पँनेलमधिल सर्व उमेदवार शिक्षित,व गावांच्या विकासाला प्राधान्य देणारे,स्वच्छ प्रतिमेचे असल्याने पँनेलला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 

यावेळी बोलताना अनिता माळी म्हणाल्या,
सुसज्ज व सर्व सोयी-सुविधा युक्त ग्रामपंचायतीची प्रशस्त इमारत बनविणार आहोत, माडग्याळ ग्रामीण रुग्णालय येथील अपूर्ण कर्मचारी व अँम्ब्युलन्स सुविधा मिळवून देऊ.महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन महिलांचे सक्षमीकरण करणार आहोत.पाण्याचे योग्य नियोजन करुन गावातील पाणीटंचाई कायमस्वरुपी संपवून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करण्याचा माझा प्रयत्न राहिल.प्राथमिक शाळा सुसज्ज व डिजीटल बनवून शैक्षणिक दर्जा सुधारणार आहे.गावातील विद्यार्थी सक्षम होईल असा प्रयत्न करणार आहे.गावात प्रशस्त वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्याचा प्रयत्न करणार आहे.
गावातील कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी उपलब्ध करुन देऊन स्वच्छ,सुंदर गाव निर्माण करणार आहे.सर्व सोयीयुक्त बसस्थानक,सोलार योजना,गावातील मुलभूत प्रश्नांसाठी विशेष ग्रामसभा बोलवण्यात येईल.गावठाण खुली जागेचे सुशोभिकरणासह, वाडी वस्तीवर पथदिवे बसवू,प्रत्येक वस्तीसाठी स्वतंत्रपणे पाण्याची योजना राबवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे सर्व योजना सर्व सामान्य,लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी माहिती केंद्र उभारून सर्व नागरिकांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न असेल.

 

तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी रोजगार निर्मिती योजना राबवू, कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार,ग्रामपंचायतचा व्यवहार पारदर्शक करुन आलेला निधी व खर्च झालेला निधी सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करून पारदर्शी कारभार आमचे पँनेल केरल असेही सौ.माळी म्हणाल्या.
खऱ्या अर्थांने मध्यवर्ती असणाऱ्या माडग्याळ येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरू करावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत.त्याशिवाय भविष्यात होणारा तालुका माडग्याळच करावा यासाठी आम्ही वरिष्ठ स्तरावरुन पाठपुरावा करू, असल्याचेही सौ.अनिता माळी यांनी सांगितले.
Rate Card
माडग्याळ : थेट संरपच पदाच्या उमेदवार सौ.अनिता माळी व सर्व उमेदवारांनी घर टू घर प्रचार सुरू केला आहे.शुक्रवारी भव्य रँली काढण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.