डफळापूर : बेंळूखी ता.जत येथे गेल्या तीन वर्षात मतदारांनी दाखलेला विश्वास सार्थ ठरवित आम्ही सर्वोत्तम विकास साधला आहे.आताही सक्षम उमेदवार,विकासाचे व्हिजन घेऊन सिध्दनाथ ग्रामविकास पँनेलच्या माध्यमातून मैदानात उतरलो असून आमच्या पँनेलचे सर्व उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील,असा दावा संरपच संभाजी कदम सर यांनी व्यक्त केला आहे.
बेंळूखी छोटे गाव असतानाही गत तीन पंचवार्षिक निवडणूकीत सक्षम उमेदवार निवडून दिल्यामुळे गावाचा नावलौकिक झाला आहे. गत १५ वर्षात आम्ही लोकहित,जनसेनेचे वृत्त जोपासले आहे.गाव, वाड्यावस्त्यावर विकास योजना राबविल्याच,शिवाय त्यापलिकडे जात जनहिताची कामे करण्यात अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नागरिकांचा मोठा पाठिंबा आम्हच्या पँनेलला मिळत आहे.
पॅनेल प्रमुख शशिकांत जाधव शेठ, शामराव चव्हाण, ज्ञानू चव्हाण, लक्ष्मण माळी,धोडिंराम चंदनशिवे, डॉ. तात्यासो माने, विलास बाबर शेठ,राजू चव्हाण, बाळासो चव्हाण, वसंत शिंगाडे, सुरेश सो.अथणी यांच्या नेतृत्वाखाली उभे असलेले श्री.सिध्दनाथ ग्रामविकास पँनेलचा विजय निश्चित असल्याचेही कदम म्हणाले.
केलेली विकासकामे
विद्यमान सरपंच कदम सरांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात केलेली भरीव विकासकामे
– 42 लाख रुपये खर्चुन भारत निर्माण योजना राबवून विहीर व पाईपलाईन पुर्ण
केली.
– एक कोटी वीस लाख रुपये खर्च करुन ओढ्यावरती दहा सिमेंट बंधारे बांधून पुर्ण
केले.
– ओढ्यावरील सर्व 24 बंधाऱ्यातील गाळ काढुन पाणी साठवण क्षमता वाढविली.
– 14 लाख खर्च करुन साहित्यासहित व्यायामशाळा उभी केली.
– 40 लाख खर्च करुन पाच शाळा खोल्या मंजूर करुन बांधुन घेतल्या.
– 10 लाख खर्च करुन स्टेज व समोरील मोकळ्या जागेत पेव्हिंग ब्लॉक बसवून चौकाची शोभा वाढविली.
– 12 लाख रुपयेची स्मशानभुमी मंजूर करुन घेतली.
– 5 लाख रुपये खर्च करुन निळूचा मळा शाळा व गबुरे वस्ती शाळांचे कंपाउंड
बांधुन घेतले.
– 4 कोटी 36 लाख रुपयेची जलजीवन मिशनची घरोघरी नळाने पाणी पुरवठा
करणारी योजना मंजूर करुन घेतली.लवकरचं काम सुरू होणार आहे.
– 5 लाख खर्च करुन पिण्याच्या पाण्याचे वॉटर एटम बसविले.
– 40 लाख रुपयाचा बेळुंखी महात्मा फुले रस्ता डांबरीकरण रस्ता मंजूर केला.
– साडेतीन लाख खर्च करून सर्व पाणंद रस्ते मुरमीकरण करुन घेतले.
– तीस लाख रुपयांचे तीन दुकान गाळे व दोन सभामंडप मंजूर केले.
– १७ लाख रुपये खर्च करुन महात्मा फुले वसाहतीत पेव्हिंग ब्लॉक चे रस्ते बनविले.
– मुख्यमंत्री सडक योजनेतून बेळुंखी – वाषाण उर्वरित रस्ता डांबरीकरण मंजूर
करुन घेतला.
– १०० घरे गेल्या दहा वर्षात गरजुना बांधुन देण्यात आली.
– आठवडा बाजार भरवून लोकांची गैरसोय दुर केली.
– सर्व सेवा सोसायटीमध्ये सुध्दा आमची सत्ता असलेने चेअरमन महादेव माळी
यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना महात्मा
फुले कर्जमुक्ती योजना राबवून लोकांना कर्जमुक्त करण्यात आले.
– पी.एम.किसान योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरुन लोकांना मदत केली.
– सिध्दनाथ ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून जात-भेद न मानता काम
करणाऱ्या माणसांना विविध पदावर संधी दिली.
– दहा लाख रुपये खर्च करुन बेळुंखी कांरडेवस्ती 300 मी. रस्ता डांबरीकरण
केला.
जाहीरनामा
पाच वर्षात पुढील कामे करण्याचे आवाहन स्विकारत आहोत.
– बेळुंखी ते कांरडेवस्ती 5 कि.मी. रस्ता डांबरीकरण करणे.
– बेळुंखी ते कुंभारी 1.5 कि.मी. रस्ता डांबरीकरण करणे.
– भुमीपुजन केलेले मायाक्का मंदिर, सिध्दनाथ मंदिर, जोतिबा मंदिर लोकवर्गनीतुन
बांधुन लोकार्पण करणे.
– उर्वरित गरजु लोकांना घरे बांधुन देणे.
– प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजुर करुन बांधणे.
– जनावरांचा दवाखाना मंजुर करुन बांधणे.
– महात्मा फुले वसाहतीत बुध्दविहार बनविणे.
– बेळुंखीतील मुख्य चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणे.
– वरली पाटील वस्ती ते कारडे वस्ती स्ट्रीट लाईट बसविणे.
– सदानंद मंदीराचा धक्का बांधुन काढणे, व समोरील जागेत पेव्हिंग ब्लॉक बसविणे.
– म्हैशाळ योजनेच्या वंचित भागाला पंपहाउस व्दारे पाणी पोहचविणे.
– सर्व पाणंद रस्ते बांधणे.
– उर्वरित ओढा व नाल्यावर आर. सी. सी बंधारे उभे करणे.
– बंदिस्त तालीम उभी करणे.
– सर्व सेवा सोसायटीची सुसज्ज अशी इमारत बांधणे.
असे आहेत उमेदवार
सरपंच पदाचे उमेदवार सौ.अंबुताई चंद्रकांत चव्हाण
वार्ड क्र.1. सौ.वनिता परसराम माळी, रेखा शिवाजी चंदनशिवे, तानाजी नारायण चव्हाण
वार्ड क्र. 2 : सावित्री विष्णू चव्हाण,सविता रेवाण्णा माळी, गजानन सुखदेव चव्हाण
वार्ड क्र. 3.बिजला धोडिंराम चंदनशिवे,सदाशिव म्हाळाप्पा अनुसे,अंकुश सुखदेव चव्हाण
सोमवारी प्रचाराचा शुभारंभ
श्री.सिध्दनाथ ग्रामविकास पँनेलच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी खलाटीतील जागृत्त देवस्थान श्री.लक्ष्मीदेवी मंदिरात श्रीफळ फोडून होणार आहे.भव्य रँलीही काढण्यात येणार आहे