करजगीला आदर्श गाव करण्यासाठी साथ द्या | – सिद्राया पट्टणशेट्टी : जिन्नेसाहेब शेतकरी आघाडी पँनेलच्या प्रचाराचा शुभारंभ 

0
करजगी(कलाण्णा बालगाव): करजगी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी श्री.जिन्नेसाहेब शेतकरी विकास आघाडी पँनेलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.प्रांरभी गावातून भव्य रँलीने पँनेल प्रमुख,उमेदवार समर्थक कार्यकर्ते,मतदार श्री.जिन्नेसाहेब दर्गा येथे आले.

 

उमेदवारांचे टेबल,नारळाची बाग,ऑटो रिक्षा,शिवणयंत्र असे चिन्ह असलेल्या बँलेट पेपरची पुजा वेदमुर्ती श्री.धानय्या हिरेमठ व दर्ग्याचे मुजावर इमाम मुजावर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.त्यानंतर पँनेल प्रमुख, संरपच पदाचे उमेदवार यांनी मतदारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

पँनेल प्रमुख मांतया मठपती म्हणाले,आमच्या पँनेलचे थेट संरपच पदाचे उमेदवार चन्नप्पा मल्लाप्पा पट्टणशेट्टी,अनुभवी,उच्चशिक्षित,तरूण उमेदवार आहेत.त्याशिवाय सदस्यपदाचेही उमेदवार सक्षम,स्वच्छ प्रतिमेचे आहेत.गावाचा विकास करून आदर्श गाव निर्माण करण्यासाठी सक्षम उमेदवार असलेल्या आमच्या पँनलेला बहुमतांनी विजयी करावे.
सिद्राया पट्टणशेट्टी म्हणाले,गावातील नागरिकांना स्वच्छ, मुबलक पाणी,गटारीची सोय,रस्त्यावर ब्लॉक,गावात लाईटची सोय याला आमची प्राथमिकता असेल,त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळाचे वर्ग बांधकामे,शासनाच्या सुविधा शेतकरी,नागरिकापर्यंत पोहचवू,लोकहितासाठी सर्वसमावेशक काम आम्ही करणार आहोत.गावच्या सर्वागिंन विकासासाठी आमच्या पँनेलचे सर्व उमेदवार विजयी करावेत,असे आवाहन केले.
यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
करजगी : जिन्नेसाहेब शेतकरी विकास आघाडी पँनेलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.