माडग्याळमध्ये जय हनुमान ग्रामविकास पँनेलला वाड्यावस्त्यावरही मोठा प्रतिसाद
माडग्याळ,संकेत टाइम्स : माडग्याळ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी जय हनुमान ग्रामविकास पँनेलचा प्रचार जोरदार सुरू असून पँनेल, जेष्ठ,महिला,युवक,कार्यकर्ते
घर टू घर प्रचार यंत्रणा राबवित आहेत.उमेदवार,चिन्ह,वार्ड यांची माहिती मतदारांना देण्यात येत आहे.पँनेलच्या सर्व उमेदवारांना गाव भागासह वाड्यावस्त्यावरील मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
उच्चशिक्षित,अनुभवी,तरूण,लोकहिताला प्राधान्य देणारे उमेदवार ही जय हनुमान ग्रामविकास पँनेलची जमेची बाजू आहे.त्याशिवाय रखडलेला गावाचा,जनहिताचे प्रश्न,मध्यवर्ती असणाऱ्या गावात शासकीय कार्यालये खेचून आणण्यात नवे पँनेल प्रयत्न करणार आहे.उच्च शिक्षणांची सोय असो,तालुका कार्यालये असो,तालुका निर्मिती या अत्यंत महत्वाच्या प्रश्नासाठी भविष्यात प्रशासनाकडे पाठपुरवा करतील.
शासकीय रुग्णालयातील अपुरे कर्मचारी, सुविधा मिळवून देण्यासाठी कठिबंध्द असतील,किंबहुना हेच प्रश्न सोडविण्यासाठी हा लढा उभारला आहे.या विकास योजना राबविण्यासाठी आमच्या पँनेलच्या सर्व उमेदवारांना मोठे मताधिक्य देऊन विजयी करावे,असे आवाहन यावेळी पँनेल प्रमुखांनी विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद सांधताना केले.
यावेळी विठ्ठल निकम,सोमाणा हाक्के,प्रदीप करगणीकर,कामाणा बंडगर,जटलिंग कोरे,श्रीशैल कोरे,अनिल माळी,बळवंत जाधव,मुऱ्याप्पा धुमाळे,नंदू पाटील,सदाशिव चौगुले,संभाजी सावंत, महेश गायकवाड,भगवान परीट,लक्ष्मण माळी,नामदेव बंडगर,अर्जुन सावंत,नंदू सावंत,बाळू रूपनूर,श्रीमंत कोरे,संगापा बंडगर,आनंदा सोलकर, नरसू माळी, बिरा हाक्के, सुखदेव सोलकर, गंगाराम कांबळे, रामचंद्र पाटील,आंबाणा माळी,जिजाबाई सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

विकासाचे सक्षम व्हिजन आमच्याकडे
ग्रामीण रुग्णालय,मोठी लोकसंख्या,गावचा मोठा विस्तार,माडग्याळी मेंढी,माडग्याळी बोर यामुळे गावाचे नाव सातासमुद्रापार गेले आहे.मात्र असे असतानाही गावाचा अपेक्षित विकास झाला नाही.अपेक्षित सुविधाही उपलब्ध नाहीत.शाळकरी मुला-मुलींची संख्या मोठी असतानाही उच्च शिक्षणाची सोयी झालेली नाही.मोठे शासकीय रुग्णालय आहे पण,अपुरे डॉक्टर, कर्मचारी,सुविधा उपलब्ध नाहीत.शासकीय कार्यालयात नागरिकांचे हाल केले जात आहे.यापुढे हे सर्व बदलण्यासाठी नवे विकासाचे व्हिजन घेऊन आम्ही निवडणूक लढवित आहोत.आमचे सर्वच उमेदवार थेट प्रंसगी यंत्रणेशी दोन हात करत गावाचे प्रश्न सोडवितील.
माडग्याळमध्ये जय हनुमान ग्रामविकास पँनेलचे उमेदवार घरटूघर प्रचार करत आहेत.