माडग्याळची मेंढी,बोरे संशोधन केंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा करणार | – जय हनुमान ग्रामविकास पँनेलच्या संरपच पदाच्या उमेदवार अनिता माळी

0

माडग्याळ,संकेत टाइम्स : माडग्याळला ऐतिहासिक वारसा असतानाही गावाचे महत्वाचा असणारा माडग्याळी मेंढी पालन,व माडग्याळी बोरे हा व्यवसाय वाढविण्यासाठी,बाजार पेठ, संशोधन केंद्र व या व्यवसायाला चालना देण्यासाठी कृषी,पशुसंवर्धन विभागाच्या‌ माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत.गावचा सर्वांगीण विकास करण्याबरोबर येथील महत्वाचे व्यवसाय अधिक प्रमाणात वाढवून बेरोजगारी संपविण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत,असे प्रतिपादन यावेळी जय हनुमान ग्रामविकास पँनेलच्या संरपच पदाच्या उमेदवार अनिता माळी यांनी विकासपर्व या दैनिक संकेत टाइम्सच्या विषयावरील चर्चासत्रात केले.

जत तालुक्याचे मध्यवर्ती गाव म्हणून माडग्याळचा उल्लेख होतो.येथेच तालुका,प्रशासकीय कार्यालये निश्चित झाले होते मात्र ती खेचून आणण्याचा लढा देता आला नाही.परिणामी त्याचा गावांच्या विकासावर मोठा परिणाम झाला आहे.
भविष्यात तालुका निर्मितीत माडग्याळच नवा तालुका व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

 

गावात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोठा जनावरे बाजार भरतो,त्याचबरोबर तेथेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजार पेठ उपलब्ध व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
Rate Card
सुसज्ज बसस्टँड,ग्रामपंचायत,ग्रामीण रुग्णालय,शैक्षणिक सुविधा,प्राथमिक शाळाचा दर्जा सुधारणे,गावातील गटारी,अतर्गंत रस्ते पक्के करणे,सांडपाण्याचा प्रश्न संपविणे,स्वच्छता, सुसज्ज बाजारपेठ निर्माण करणे,गल्लीतील बोळाची सुधारणा करणे,वाड्यावस्त्यांना जोडणारी रस्ते मजबूत, पक्के करणे,मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय करण्याबरोबर,शेतीला पाणी मिळावे यासाठी म्हैसाळ योजनेचा विस्तार करण्यासाठी आमचे सर्व उमेदवार भविष्यात प्रयत्न करणार आहेत.पाणी समृद्ध गाव करण्यासाठी पावसाचा प्रत्येक ठेंब मुरविणे यासाठी शासनाच्या पाणी अडवा, पाणी जिरवा सारख्या योजना राबविणार आहोत.

 

गावातील मुले विविध स्पर्धा परिक्षा,पोलीस भर्ती,सैन्यभर्तीसाठी गावातचं सराव करू शकतील अशी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमचे पँनेल प्रयत्न करणार आहे.प्रसिद्ध माडग्याळी मेंढी,माडग्याळी बोर उत्पादनासाठी कृषी विभागाच्या‌ माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबविणार आहोत.हिवरे बाजारच्या धर्तीवर गावाचा विकास करण्याचा आमचा मानस असल्याचेही अनिता माळी यांनी सांगितले.

 

यावेळी वार्ड क्र.१: महादेव मारूती माळी,निर्मला सिध्देश्वर कोरे,शोभा शशिकांत माळी वार्ड क्र.२: सौ.संगिता श्रावणकुमार कोरे,शिवानंद सोमाण्णा हाक्के,वार्ड क्र.३: पिराप्पा अमृता कांबळे,बाळासो सुखदेव सावंत वार्ड क्र.४ : सविता रामचंद्र सांवत,प्रकाश तुकाराम बंडगर,वार्ड क्र.५ : पांडुरंग विठ्ठल सांवत,निकिता अंबाण्णा कांबळे,शारदा कल्लाप्पा माळी हे उमेदवार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.