युवाक्रांती ग्रामविकास परिवर्तन पँनेल | बेंळूखीला आदर्श बनविण्यासाठी युवाक्रांती ग्रामविकास पँनेल मैदानात
बेंळूखीचे पहिले लोकनियुक्त संरपच स्व.वसंतराव चव्हाण यांच्या आदर्श विचाराने प्रेरित बेंळूखीत परिवर्तनाची हाक युवाक्रांती ग्रामविकास पँनेलच्या माध्यमातून मतदारांना केली आहे. स्व.वसंतराव चव्हाण यांनी संरपच पदाच्या कार्यकालात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.बेंळूखी सारख्या छोट्या गावात अगदी प्रचंड कष्ट,सामान्य कुंटुबातून आलेले पहिले लोकनियुक्त संरपच वंसतराव चव्हाण यांच्यासारखे सार्वजनिक जीवनातील एक चैतन्यमय मनोहर नेतृत्व सर्वांशी मिळून मिसळून राहणे,कुणालाही तोडून न बोलणारा,आपल्या पदाचा कधीही गर्व न करणारा एक सामान्य नेता म्हणून पंचक्रोषित त्यांची ओळख होती.

त्यांच्याच कामाचा आदर्श घेऊन त्यांच्या पत्नी सुनीता चव्हाण या थेट संरपच पदाची निवडणूक लढवित आहेत.त्यांना मिळणारा पाठिंबा त्यांच्यासह सर्व पँनेलच्या उमेदवारांना विजयापर्यंत नेहणारा ठरणार आहे.लोकहित गावातील समस्याची पूर्णत: सोडवणूक करण्यासाठी युवाक्रांती ग्रामविकास पँनेल ही लढाई लढत आहे.विकासकामातून गावांचा नावलौकिक करणे,लोकहिंताचा अजेंडा घेऊनच सर्व उमेदवार प्रचाराचा धुरळा उडवित आहेत.