विक्रम भैय्या ढोणे : जत तालुक्यातील अश्वासक चेहरा

0
4
करे अल्पज्ञानी बहु बडबडाट। जसा निर्झराचा अति खळखळाट॥
असे पुर्णज्ञानी कमी बोलणारा।  विना नाद वाहे जशी गंगाधारा॥
समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर, काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्व देतात. निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा गंगाधारेसारखे संत वहात जतच्या राजकारणात स्वं:कृत्वावाने ओळख निर्माण करणारे संघर्षशील युवक नेते विक्रमभैय्या ढोणे होय. शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कल्पक, चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून जतच्या राजकीय पटलावर नावलौकिक आहे. लोकहितार्थ, विकासाभुमिख,कर्तव्यदक्ष, लोकसंग्रह, विविध आंदोलनातून केलेले काम आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चारित्र्यसंपन्नता लाभलेले एक असामान्य नेतृत्व म्हणजेच युवक नेते विक्रमभैय्या ढोणे होय. राजकीय व्यक्तीमत्वासाठी लागणार्‍या  अनेक निकषांशिवाय संयमी, स्पष्टवक्तेपणा, मनमिळावू स्वभाव, जनसेवेसाठी सदैव तत्पर आणि महत्वाची बाब म्हणजे खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्टवक्ते नेते कोणताही राजकीय वारसा नसताना सामान्य घरात जन्माला येवून कर्तुत्ववाने समाजसेवेची परंपरा कृतीतून सिध्द करावी लागते,ढोणेनी आपल्या अलौकिक आणि अजोड कर्तुत्वाने सिध्द केले आहे. याच ताकतीने या लोकसेवकाने जनतेच्या ह्रदय सिंहासनावर अढळ स्थान निर्माण केले आहे.

 

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत साळमळगेवाडी येथे आपल्या समर्थकांची पुर्ण सत्ता व आक्कळवाडी येथे एक सदस्य निवडून आणत तालुक्यातील राजकारणात प्रवेश थाटात केला आहे. या असामान्य नेतृत्वाचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या कार्याचा छोटासा आढावा…

जत शहरातील सामान्य कुंटुबात विक्रमभैय्या ढोणे यांचा जन्म, संघर्षासाठी झाला म्हटल्यास वावगे वाटणार नाही.तालुक्यातील अज्ञान दुर्लक्षित जनतेला लुटणाऱ्या सरकारी बाबूना वटणीवर आणून सामान्यासाठी काम सुरू केले आहे. अगदी अल्प वयात तालुक्यातील घराघरात पोहचलेले युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

 

 

सर्वसामान्य माणसाचा विकास आणि अडल्या-नडलेल्यांना मदतीचा हात देणे हे विक्रम ढोणे यांच्या स्वभावाची खासियत ढोणेसाहेबांच्या कामाची पद्धतही इतरांपेक्षा खूपच वेगळी आहे. या कार्यामुळे विक्रम भैय्याची ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची सक्षम फळी निर्माण झाली आहे. निवडणुकांमधल्या यशावर लक्ष केंद्रित करण्याआधी ग्रामीण भागात कार्यकर्ते उभे करण्यावर त्यांनी भर दिला. आजघडीला त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची सक्षम फळी तयार आहे. विक्रमभैय्या ढोणे  यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन काम करणे. तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवून देणे ही त्यांची शैली आहे. आजवर त्यांनी युवकांना विश्वासात घेऊन सक्षम तालुका कसा बनेल यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. आपला कार्यकर्ता आर्थिक सक्षम कसा घडला जाईल याचाच ते कायम विचार करत असतात. याच ध्येयातून ते आपला कार्यकर्ता घडवत आहेत. मग कोणाला रोजगार तर कोणाला स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांच्या पंखाला उडण्याचे बळ देण्याचे काम ते करत असतात.तरुण-तरुणींनी केवळ नोक-या न करता स्वयंरोजगाराकडे वळावे, याकडे त्यांचा अधिक कल असतो. माणसांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यामुळे बेरोजगारांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवून देत त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी धडपडणारा नेता अशी त्यांची वेगळी ओळख झाली आहे.सध्याचे जग सोशल मीडियाचे आहे.

 

युवा नेते विक्रम ढोणे यांची युवावर्गात असलेल्या लोकप्रियतेची प्रचिती येते. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात त्यांना मानणारा मोठा युवावर्ग आहे. रोजच्या फेसबुक अपडेटमध्ये विक्रम भैय्या ढोणे  यांच्या कार्याला मिळणा-या हजारो लाईक्स, शेअर, कमेंट यांमधून त्यांच्या कार्याचा तरुण मनावर किती प्रभाव आहे हे दिसून येते. यातून अनेक युवा कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळते.

 

विक्रमभैय्याच्या आंदोलनातील काही ठळक व प्रभावी आंदोलने
• निगडी खुर्द कृषी घोटाळा सिध्द करून घोटाळ्यातील 12 लाख रूपये सातत्याने पाठपुरावा करून शासनाच्या खात्यात भरण्यास भाग पाडले.
• तालुक्यातील दहा गावांचा दलित निधी जिल्हा बाहेर होता.तो प्रशासनाच्या निदर्शनास आणून तो निधी खर्च करण्यास भाग पाडला.
• जत शहरातील महिला पुरूष स्वच्छतागृहासाठी सातत्याने पाठपुरावा करून नगरपरिषदेचे लक्ष वेधले.
• तालुक्यातील प्रशासनातील अधिकारी,कर्मचाऱ्याचा अनुशेषाकाडे लक्ष वेधण्यासाठी घटानांद आंदोलन केले.आंदोलनादिवशीच तत्कालीन आमदारांनी सभागृहात प्रश्न मांडला.मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणूका झाल्या.
• जत शहरातील प्रश्नासाठी कचऱ्यात बसून नगरपरिषदेसमोर अनोखे आंदोलन केले.
• महत्वाच्या नेते,व्यक्ती,मान्यवरांच्या प्रत्येक कार्यक्रमात वृक्ष भेट देऊन पर्यावरणासाठी उल्लेखनीय काम केले.
• तालुक्यातील सैन्य भर्तीतील मुलांना नोटरीची गरज बघून शेकडो तरूणांना नोटरीची कागदपत्रे मिळवून दिली.
• धनगर समाजाच्या आरक्षणावर राज्यभर अभ्यासपुर्ण मांडणी करून आवाज उठविला.
• तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांची कामे करून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा.
• तालुक्यातील विद्यार्थी, बेरोजगार तरूण,शेतकरी,सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी सातत्यपुर्ण लढा सुरू आहे.
•एसटी भरती प्रक्रियेत दुष्काळी जत तालुक्यातील युवकांचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा करून सांगली जिल्ह्याचा भरती प्रक्रियेत समावेश करण्यास भाग पाडले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचा पुतळा शासकीय निधीतून उभा करण्यासाठी सोलापूर येथे आंदोलन करून शासकीय निधीतून उभा अहिल्यादेवींचा पुतळा करण्यास शासनास भाग पाडले
तीन आंदोलनाच्या प्रश्नांची राज्याच्या अधिवेशन काळात विधिमंडळात चर्चा घडवून आणणारा ग्रामीण भागातील लढवय्या कार्यकर्ता अशी ओळख

 

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here