डफळापूरच्या महाजन परिवाराच्या आधारवड काळाच्या पडद्याआड | – विद्या काकू यांचे निधन
डफळापूर,संकेत टाइम्स : येथील विद्या प्रभाकर महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.डफळापूर येथील भूसारी व्यापारी राजू महाजन यांच्या त्या पत्नी होत्या.तर बल्लू महाजन यांच्या आई होत.
डफळापूर येथील मोठ्या असणाऱ्या महाजन परिवारातील आधारवड,मार्गदर्शक मनमिळावू स्वभावाच्या विद्या काकूचे अचानक जाण्यामुळे महाजन परिवारात न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.सोमवारी सायकांळी त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पती,दिर,मुलगा,मुलगी,सुना,नांतवडे असा मोठा परिवार आहे.
