विक्रम भैय्या ढोणे : जत तालुक्यातील अश्वासक चेहरा
जत शहरातील सामान्य कुंटुबात विक्रमभैय्या ढोणे यांचा जन्म, संघर्षासाठी झाला म्हटल्यास वावगे वाटणार नाही.तालुक्यातील अज्ञान दुर्लक्षित जनतेला लुटणाऱ्या सरकारी बाबूना वटणीवर आणून सामान्यासाठी काम सुरू केले आहे. अगदी अल्प वयात तालुक्यातील घराघरात पोहचलेले युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
सर्वसामान्य माणसाचा विकास आणि अडल्या-नडलेल्यांना मदतीचा हात देणे हे विक्रम ढोणे यांच्या स्वभावाची खासियत ढोणेसाहेबांच्या कामाची पद्धतही इतरांपेक्षा खूपच वेगळी आहे. या कार्यामुळे विक्रम भैय्याची ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची सक्षम फळी निर्माण झाली आहे. निवडणुकांमधल्या यशावर लक्ष केंद्रित करण्याआधी ग्रामीण भागात कार्यकर्ते उभे करण्यावर त्यांनी भर दिला. आजघडीला त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची सक्षम फळी तयार आहे. विक्रमभैय्या ढोणे यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन काम करणे. तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवून देणे ही त्यांची शैली आहे. आजवर त्यांनी युवकांना विश्वासात घेऊन सक्षम तालुका कसा बनेल यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. आपला कार्यकर्ता आर्थिक सक्षम कसा घडला जाईल याचाच ते कायम विचार करत असतात. याच ध्येयातून ते आपला कार्यकर्ता घडवत आहेत. मग कोणाला रोजगार तर कोणाला स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांच्या पंखाला उडण्याचे बळ देण्याचे काम ते करत असतात.तरुण-तरुणींनी केवळ नोक-या न करता स्वयंरोजगाराकडे वळावे, याकडे त्यांचा अधिक कल असतो. माणसांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यामुळे बेरोजगारांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवून देत त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी धडपडणारा नेता अशी त्यांची वेगळी ओळख झाली आहे.सध्याचे जग सोशल मीडियाचे आहे.
युवा नेते विक्रम ढोणे यांची युवावर्गात असलेल्या लोकप्रियतेची प्रचिती येते. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात त्यांना मानणारा मोठा युवावर्ग आहे. रोजच्या फेसबुक अपडेटमध्ये विक्रम भैय्या ढोणे यांच्या कार्याला मिळणा-या हजारो लाईक्स, शेअर, कमेंट यांमधून त्यांच्या कार्याचा तरुण मनावर किती प्रभाव आहे हे दिसून येते. यातून अनेक युवा कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळते.