कवठेमहांकाळ विकास आराखड्याचा प्रश्न नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात

0
8
कवठेमहांकाळ : नुकताच कवठेमहांकाळ शहराचा विकास आराखडा प्रसिद्ध झाला आहे.या आराखड्यात घेतलेले रस्ते,खुले मैदान,दवाखाने पाहता अल्पभूधारक शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय झालेला असून हा आरक्षण आराखडा रद्द करून नवीन आराखडा तयार करण्यात यावा.नवीन केल्या जाणाऱ्या आराखड्यामध्ये गायरान,बिगर शेती खुली जागा आणि इतर शासकीय जागेवर आरक्षण टाकले जावे.तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आराखडा रद्द करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी पत्राद्वारे तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.

 

नागपूर येथे आमदार सुमनताई पाटील,पालकमंत्री सुरेश खाडे,विधानपरिषदेचे आमदार रमेश पाटील,खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कवठे महांकाळ शहराचा विकास आराखडा रद्द करण्याबाबत निवेदन दिले.यावेळी राष्ट्रवादी ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी,शमशुद्दिन पारेकर,संजय कोठावळे आदी मंडळी कवठे महांकाळ शहरातील आरक्षण पीडित शेतकरी,प्लॉटधारक,नागरिक तसेच महिला वर्ग यांच्या वतीने उपस्थित होते.दरम्यान दिनांक २९ डिसेंबर रोजी कवठेमहांकाळ नगरपंचायत येथे झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,विरोध पक्षनेते,गटनेते,सर्व नगरसेवक,माजी नगराध्यक्ष यांचे  प्रयत्नांमुळे आराखडा रद्दचा ठराव पास करण्यात आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here