जतसाठी वैशिष्ट्यपुर्ण योजनेतून दिड कोटीचा निधी मंजूर

0
जत,संकेत टाइम्स : जत शहरासाठी विविध योजनेसाठी नागपूर ‌येथील हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांतून नगर विकास खात्याकडून वैशिष्ट्य पुर्ण योजनेतून १ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी शासनाकडे मागणी केली होती.
या दिड कोटी निधीतून जत शहरातील महात्मा बसवेश्वर चौक सुशोभीकरण ७५ लाख तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक सुशोभीकरण यासाठी ७५ लाख असे दिड कोटीचा निधीस सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंजूरी देण्यात आली आहे.

 

 

यामुळे जत शहराच्या सुंदरतेत भर पडणार असून जत शहरातील विजापूर मार्गवरील महात्मा बसवेश्वर चौकाचे सुशोभीकरणामुळे विजापूर-गुहागर मार्गाच्या सुंदरतेत भर पडणार आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.