आंनददायी | अहंकार नको नाती जपा

तब्बल वीस वर्ष मनातून व मनापासून जपलेल नातं समोरच्या व्यक्तीने अगदी काही महिन्यात दुसऱ्याचे ऐकून सहज तोडून टाकणे व ते नातं जपण्यासाठी धडपडणाऱ्या व्यक्तीलाच,” तुला नाते टिकवता येत नाही” अशी बोच देऊन निघून जाणे हा घाव जिव्हारी बसू शकतो. असा अनुभव अनेक नात्याने आनेकांना येतो. जी व्यक्ती नातं जपण्यासाठी धडपडत होती तीच व्यक्ती त्या नात्याच्या उडालेल्या एकूण एक ठिकर्या कायमच्या संपविण्यासाठी धडपडू शकते आणि त्या नात्यात पुन्हा कधीही जिवंतपणा येऊ नये यावर ठाम होऊ शकते. इथे नात्याऐवजी अहंकाराला खतपाणी घातले जाऊ शकते.