जत,कोकटनूर यात्रेतील दुचाकी चोरीचा छडा | तब्बल एवढ्या दुचाकीसह चोरटा ताब्यात

0
Rate Card
जत,संकेत टाइम्स : जत व कर्नाटकातील कोकटनूर येथील यल्लमा यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन दुचाकी व मोबाईल मोठ्या प्रमाणात चोरी झाले होते.पोलीसात दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलीसांनी दुचाकी व मोबाइल लंपास करणार्‍या कर्नाटकातील तरूणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून महाराष्ट्रासह कर्नाटकातील यात्रेत चोरलेल्या ११ दुचाकी व चार मोबाइल असा जवळपास साडेसात लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

 

मोदीनसाब सरदारसाब वालीकर (वय 21 रा. हैनाळ, ता. इंडी जि. विजापूर) असे संशयित चोरट्याचे नाव आहे.वालीकर हा जत तालुक्यातील व्हसपेठ ते गुड्डापूर रस्त्यावर गाडी नंबर नसलेली  दुचाकी घेऊन येत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी आमसिध्दा खोत यांना मिळाली होती.त्या माहिती आधारे सहायक फौजदार अच्युत सुर्यवंशी व अमोल ऐदळे, वैभव पाटील, सागर टिगरे आदींच्या पथकाने सापळा लावत‌ त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या विना नंबरच्या दुचाकीबाबत विचारले असता तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. यामुळे त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांने जत,कोकटनूर यात्रेतून दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली.

जत व कोकटनूर यात्रेच्या ठिकाणी चोरी केलेल्या अन्य १० दुचाकी व्हसपेठ गावच्या हद्दीमध्ये दावल मलिक देवस्थानसमोरील दोन डोंगरामधील पैगंबर पाटील यांच्या शेतातील लिंबाच्या झाडीमध्ये लपविल्या असल्याचे सांगितले.

 

पोलीसांनी घटनास्थळी भेट देत चोरीच्या सर्व दुचाकी हस्तगत केल्या आहेत. विजापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून या ११ दुचाकीची चोरी केली असल्याची कबुली संशयिताने दिली. त्याच्याकडे चार मोबाईल सापडले आहेत. अथणी, कोकटनूर, गुड्डापूर यात्रेमधून या चोर्‍या त्यांने केल्या आहेत.पोलीसांनी कसून तपास सुरू ठेवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.