विशेष | जगण्याचा उत्सव साजरा करुयात !

0
२०२२ वर्षाला निरोप देऊन आपण २०२३व्या वर्षात पदार्पण करत आहोत.मागील काळाने आपल्याला खुप काही शिकवले‌. कोरोनाच्या काळात विस्कटलेली घडी बसवण्यात आपलं वर्ष गेलं परीस्थीतीतुन आपण मार्ग काढत आपण हे वर्ष घालवले .तरीही आर्थिक  ओझ्याखाली माणुस दबलेला आहे.तरीही आपण ऐकऐक संकटातून बाहेर पडलो आहे.जगात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे.तरीही आपण घाबरून जाण्याचे कारण नाही.यापुर्वी आपण अशा संकटांचा सामना केलेला आहे.
२०२३वर्ष नव्या  वर्षात सुरुवात करत आहोत . नवनवे आव्हानं पेलण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे.सरत्या वर्षाला निरोप देऊन आपण नव्या वर्षात उत्साहात सामोरे जावे.प्रत्येकाच्या नव्या आकांक्षा,संकल्प असतील जी काही पुर्ण झाली नाहीत.ती आपण या वर्षात करण्याचा संकल्प करुया.केवळ संकल्प करून चालणार नाही.  तर ते अमलात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायला हवेत.
आपले जीवन हा एक उत्सव आहे.त्यामुळे आपण जगण्याचा उत्सव केला पाहिजे.काळ गतीने पुढे चालला आहे .वर्षाचे ३६५दिवस कसे भुर्रकन निघून जातात ते कळत देखिल नाही.प्रत्येक गोष्ट ही आपल्याला अनुकूल असेल असे नाही.या वर्षात मनाशी बाळगलेले स्वप्न पुर्ण करा.त्यासाठी कितीही संघर्ष करायची वेळ आली तरी मैदान सोडू नका.

 

आपल्यात सकारात्मक भावना असणं खुप गरजेचे आहे.नकारात्मक भावनांपासून दुर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्वता:ला ओळखले तर आपल्या स्वप्नपुर्तीसाठी बळ मिळेल.स्वता:ला अंतर्मनातून कणखर बनवा.आपल्या आयुष्यावर भरभरून व कौतुक करा.आपलं जीवन हा उत्सव आहे.जगण्याचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक मिळालेला सुंदर क्षण मिळालेला अनुभव आयुष्यात खुप महत्वाचा आहे.

 

मागं घडलेल्या घडामोडी विसरुन जा सतत भुतकाळाचा विचार करत बसल्यास आपला वर्तमान काळ बिघडतो.त्यामुळे झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागा.जीवनात मौजमजेबरोबरच चांगल्या विचारांचा अंगिकार करा.मीपणा सोडा ,आपण नमते घेतल्याने काही बिघडत नाही.आपले छंद जोपासा आपल्या आवडीचे छंद तसेच कामाच्या व्यापातून राहुन गेलेल्या गोष्टी यावर्षात पुर्ण नक्कीच करता येतील.
Rate Card
प्रत्येकाकडून नवीन काही ना काही शिका मग ते कुटुंबातील असो व कुटुंबाबाहेरची असु देत .सतत शिका जे तुम्हाला मदत करतात .त्यांचे आभार माना.जर काही चुक झाल्यास माफ करायला शिका.स्वता:च्या आवडी निवडी जोपासा.जगण्याचा अर्थ आपल्याला तेथेच  समजेल.जघण्याच्या उत्सवात आपण सहभागी झाले पाहिजे.
आपले जगणे सुंदर होण्यासाठी आपण कसे सामोरे जातो.यावर सार्या गोष्टी अवलंबून आहे.वर्षाचा ३६५ दिवसाचा प्रवास सुखकर झाला पाहिजे.त्यासाठी स्वता:शी प्रामाणिक राहून आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात जगणे यासारखी कोणती गोष्ट असेल.२०२३ वर्ष उत्साहाचे आहे.आपण आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे.
आपल्या कुटुंबासाठी वेळ काढा . प्रत्येकाची परीस्थीती वेगवेगळी असते.हे कायम ध्यानात ठेवा. मनात कसलाही क्लेष न ठेवता आयुष्याच्या आनंदात सामील व्हा.आयुष्य समरसून जगा.वर्षातला एक एक दिवस खुप मोलाचा आहे.एक एक दिवस हातचा निघून जात आहे.तेव्हा जगण्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण नेहमी सज्ज झाले पाहिजे.
संतोष दत्तू शिंदे
मु.पो.काष्टी ,ता.श्रीगोंदा, जिल्हा, अहमदनगर
महाराष्ट्र
मो.७७२१०४५८४५

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.