भिषण स्फोट | ५ कामगार दगावले,२५ जण गंभीर जखमी झाल्याचा अंदाज

0

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत एक धक्कादायक घटना घड़  असून शोभेच्या दारू तयार करणाऱ्या कारखान्यात नववर्षाच्या आंरभाच्या दिवशी मोठा स्फोट झाला. स्फोटात प्राथमिक माहितीनुसार पाच जणाचा मृत्यू झाल्याचे समोर येत असून जवळपास २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या स्फोटात मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

 

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारू तयार करण्याचा कारखाना आहे. याठिकाणी विविध पध्दतीचे फटाके, दारूगोळे तयार करण्यात येतात.दररोजप्रमाणे काम सुरू असताना आज रविवार ता.१ जानेवारी २०२३ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कारखान्यात अचानक स्फोट झाला.त्यावेळी कारखान्यात मोठ्या प्रमाणात कामगार काम करत होते.त्यात प्राथमिक अंदाजानुसार ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.