सूर्योदय उद्योग समूहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा | संस्थापक अनिल इंगवले यांचा सोलापूर आयडॉल्स पुरस्काराने गौरव

0
3
सांगोला : सांगोला येथील सुप्रसिद्ध उद्योजक सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिल इंगोले यांना विविध मान्यवरांच्याहस्ते सोलापूर ऑयडॉल २०२२ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लायन्स क्लब इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागामध्ये औद्योगिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आयडॉल्स ऑफ सोलापूर डिस्टिक हा पुरस्कार देण्यात येतो. गुरुवार दि.29 डिसेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहामध्ये डॉ.नवल मालू यांच्याहस्ते सन्मानपूर्वक हा पुरस्कार देत इंगवले यांना गौरविण्यात आले.

 

 

सन 2010 साली अनिल इंगवले यांनी सहकारी मित्र डॉ.बंडोपंत लवटे,जगन्नाथ भगत गुरुजी, सुभाष दिघे गुरुजी या तीन मित्रांना घेऊन मेडशिंगी सारख्या छोट्या गावामध्ये व्यवसायास सुरुवात केली होती.आज इंगवले यांच्या सूर्योदय उद्योग समुहाचे सांगोला शहरासह महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये काम चालू असून अनेक लोकांच्या हातांना काम मिळवून दिले आहे. सूर्योदय उद्योग समूहाच्या माध्यमातून सांगोला शहरांमध्ये सूर्योदय सुटिंग शूटिंग, सूर्योदय लीलन हाऊस, सूर्योदय ई बाईक,सूर्योदय मोबाईल शॉपी,सूर्योदय ज्वेलर्स तसेच सूर्योदय अर्बन व सूर्योदय अर्बन महिला एल के पी मल्टीस्टेट या संस्थांच्या व उद्योगाच्या माध्यमातून अनेक तरूणांच्या हाताला काम दिले आहे.

 

सूर्योदय उद्योग समूहात सध्या 200 पेक्षा जास्त युवकांना हाक्काचा रोजगार मिळाला आहे.व्यवसायाचा विस्तारासह यापुढेही तरूणांना रोजगार मिळवून देण्याबरोबरचं विविध व्यवसायाच्या माध्यमातून दर्जेदार वस्तु,सेवा तर संस्थाच्या माध्यमातून छोट्या,मोठ्या उद्योग, व्यवसायिकांना आर्थिक हातभार देणार आहोत,असे यावेळी बोलताना अनिल इंगवले म्हणाले.
दरम्यान इंगवले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here