क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी | – सौ.अनिता माळी 

0
3

माडग्याळ,संकेत टाइम्स : माडग्याळ ता.जत येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. प्रांरभी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला संरपच अनिता माळी यांच्याहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी परमपुज्य श्री.सिध्देश्वर महास्वामीजी यांना श्रंध्दाजली वाहण्यात आली.

 

यावेळी संरपच अनिता माळी म्हणाल्या,महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य १८व्या शतकात समाजाचा मोठा विरोध पत्कारत स्त्री-शिक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी ओळखले जाते. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

 

इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला.
इ.स. १८९६-९७ दरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला.

 

सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे.
यावेळी ग्रामपंचायतीचे नुतन सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here