जत,संकेत टाइम्स : शहर व परिसरातील २ कोटी २५ लाखाहुन अधिक रुपये रकमेच्या विविध विकासकामांचे उदघाटन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले. या विकासकामांतर्गत रस्ते डांबरीकरण, नव्या गटारांची निर्मिती, ट्रिमिक्स रस्ता करणे यासह स्मशानभूमी सुभोभिकरणाचे काम केले जाणार आहे.
जत शहराचा कायापालट करण्याच्या दृष्टीने नेहमीच निधी उपलब्ध करून देण्यावर भर दिलेला आहे. सर्वसामान्य जतकरांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे व राहीन अशी ग्वाही याप्रसंगी उपस्थित नागरिकांना आ.सावंत यांनी दिली.