फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

0
सांगोला : येथील फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहातसंपन्न झाला. शालेय जीवनामध्ये जसे अभ्यासाला महत्त्व आहे, तसेच मैदानी खेळांना सुद्धा महत्त्व आहे.

 

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये  विद्यार्थ्यांच्या मैदानी प्रगतीचा आढावा घेत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी
प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला स्पोर्ट ऑफिसर सौ. सुप्रिया गाडवे,संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुरेखा रुपनर, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर दिनेश रुपनर, डायरेक्टर सौ.सारिका रुपनर, डॉ.ऋचा रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे,इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.बी.शेंडगे, फार्मसी कॉलेजचे
प्राचार्य डॉ. संजय बैस, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य प्रा. शरद पवार व स्कूलचे प्राचार्य सिकंदर पाटील,ए.ओ. वर्षा कोळेकर हे मान्यवर उपस्थित होते.

 

प्री-प्रायमरी विभागात धावणे, कॅरेट बनी, कॅप अँड गॉगल ,पोटॅटो रेस आदी,प्राथमिकविभागांमध्ये गेट रेडी फॉर स्कूल, बेडूक उड्या ,लिंबू चमचा, १०० मी.
धावणे, बुक बॅलन्स आदी,माध्यमिक गटामध्ये खो-खो ,कबड्डी, लंगडी, बास्केटबॉल,थ्रो बॉल आदी तर ज्युनियर कॉलेज विभागामध्ये कबड्डीचे सामने अतिशय चुरशीने खेळले गेले.वार्षिक क्रीडा महोत्सवाचे नियोजन वनिता बाबर व पंचाक्षरी स्वामी यांनी केले.सूत्रसंचालन सतीश देवमारे,शितल लिगाडे,मनीषा शिंदे यांनी,आभार किरण कोडग यांनी व्यक्त केले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.