जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्र राज्यातील समग्र शिक्षा योजने अंतर्गत ६२९० कर्मचारी मागील १५ ते १८ वर्षा पासून शासकीय सेवेत करार पद्धतीने काम करत आहेत हे सर्व कर्मचारी आपआपल्या विषयामध्ये उच्च शिक्षित अनुभव संपन्न आहेत.१५ ते १८ वर्षापासून सतत करार सेवेत असल्यामुळे तुंटपुज्या व कमी मासिक मानधनावर जि प, न पा, महानगर पालिका येथे काम करत आहेत.शासन सेवेत सामावून न घेतल्यास आमच्या वर उपसमारीची व बेरोजगारीची वेळ येणार आहे.त्यामुळे शासनाने तात्काळ समग्र शिक्षा योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामवून घ्यावे,अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.मुख्यमंत्री शिंदे यांच्या इस्लामपूर दौऱ्याप्रंसगी शिंदे गटाचे जत तालुक्यात संपर्क प्रमुख योगेश जानकर यांच्याकडे संघटनेच्यावतीने निवेदन दिल्याची माहिती अध्यक्ष सुरेंद्र सरनाईक यांनी सांगितले.
निवेदनात म्हटले आहे की देशातील ओरीसा, हरियाणा ,दिल्ली, हिमाचल प्रदेश राजस्थान, पंजाब या राज्यांनी समग्र शिक्षा योजने अंतर्गत कर्मचारी यांना सेवेत कायम केले आहे.महाराष्ट्रातील अशा कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य सरकारने कायम करावे. त्याच प्रमाणे दरवर्षी १० टक्के वाढ करण्याचे ठरले असतानाही सन २०१८-१९ नंतर गेल्या ५ वर्षामध्ये अशी कोणतीही वाढ झालेली नाही.महागाही वाढून ही वाढ देण्यात आलेली नाही. हा आमच्यावर अन्याय आहें. गेल्या ५ वर्षाची मानधन वाढ मिळावी,समग्र शिक्षा करार कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करून घ्यावे,असे निवेदनात म्हटले आहे.
सहा प्रकल्प अधिकारी संतोष ढवळे, प्रोग्रामर अर्जुन चव्हाण,उपाध्यक्ष प्रदिप कदम,महेश पाटील, नामदेव शेळके,सचिव प्रशांत चंदनशिवे, शब्बीर फकीर,वाळवा तालुका प्रतिनिधी कैलास कुंभार,भालचंद्र कोळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करू : योगेश जानकर
गेल्या ५ वर्षापासून करार पध्दतीने काम करणारे समग्र शिक्षा योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामवून घ्यावे व त्यांना नवीन करारात १० टक्के मानधन करावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देऊन त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करू,असे आश्वासन यावेळी योगेश जानकर यांनी शिष्टमंडळाला दिली.