ग्रामपंचायत सदस्यांने केली स्व:खर्चातून स्मशाभूमीची स्वच्छता

0
3
करजगी :  करजगी( ता जत) येथील करजगी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ चे नूतन सदस्य गुराप्पा शिरसप्पा जेऊर यांनी स्मशानभूमीत स्व:खर्चाने जेसीबी लावून काटेरी झुडपे काढून टाकत स्मशानभूमीची स्वच्छता केली.
करजगीतील या स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढल्याने अंत्यविधी करताना मोठ्या अडचणीचे ठरत होते.जेऊर यांनी स्व:खर्चातून हे काम करत वेगळा आदर्श निर्माण केला आहे.जेऊर सातत्याने अशा सामाजिक कार्यक्रमांसाठी मदत करत असतात.

 

 

यावेळी सरपंच चन्नाप्पा मल्लाप्पा पट्टणशेट्टी,भीमाशंकर गदगेप्पा मेडेदार, (सोसायटी चेअरमन) बसय्या हिरेमठ,सुरेश अक्कलकोट, रमेश सायगांव,राजू कोळी, श्रीशैल पट्टणशेट्टी, महीबूबखादरी बिराजदार, महादेव पट्टणशेट्टी, शिवानंद अंगडी,अमगोंड बालगांव, युशुब बिराजदार, सादिक बिराजदार, सिद्धाप्पा रेवी, सुरेश सायगांव आदी उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here