मुचंडी जवळ बोलोरो-क्रेटा कारची समोरासमोर धडक | पाच जखमी : दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान

0
संख,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील मुचंडी-दरीबडची रस्त्यावर पायाणी वस्तीजवळ महेंद्रा बोलोरो व क्रेटा गाडीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये बोलोरो गाडीतील एक तर क्रेटा गाडी मधील ५ जण जखमी झाले असून प्राथमिक उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली येथे पाठविण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की,मुचंडी जवळ पायाणी वस्तीजवळ महेंद्रा बोलोरो व क्रेटा गाडीची समोरासमोर धडक झाली.यामध्ये अंकलगी (ता.जत) येथील माजी सोसायटी चेअरमन बुजरीकसो चिनंगीसो मुल्ला (वय ६५) हे गंभीर जखमी असून यांची महेंद्रा बोलोरो गाडी (एमएच ११, सीजी ८०५९)मधून अंकलगी ते अथणी जात होते.तर क्रेटा गाडी (एमएच १०,बीएल ५८८७) मधील सोमनींग महादेव जमगोंड (रा. दरीबडची ता.जत) हे जतहुन दरीबडचीला कार्यक्रमासाठी वाजत्री लोकांना घेऊन येत होते.पायाणी वस्ती जवळ दोन्ही गाडीची समोरासमोर धडक झाली.

 

यामध्ये क्रेटा गाडीतील बाळाप्पा निंबेवा ऐवळे (वय ६५),गोपाल काडप्पा ऐवळे (वय ४५),भीमराव मारुती ऐवळे (वय २५),हाजिनाथ काडप्पा ऐवळे (वय ४०),दशरथ मंग्याप्पा ऐवळे (वय ६० सर्व रा. मेंढेगिरी) या ५ पाचजण पैंकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अन्य तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.त्यांच्यावर जत ग्रामीण रुग्णालय येथील प्राथमिक उपचार करण्यात आले. सदर पुढील उपचारासाठी सांगली येथे पाठविण्यात आले आहे.अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.जत पोलीस अधिक तपास करत आहेत.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.