अनुभव हाच खरा मार्गदर्शक

0
माणसाला आयुष्यामध्ये अनेक अनुभव येत असतात.सतत अनुभवातून तो काही ना काही शिकत असतो.अनुभवातुनच माणुस जास्तीत शिकला जातो.त्यासाठी जिवनात अनुभवाला खुप मोठे महत्त्व आहे.सभोवताच्या सामाजिक स्तरातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात.काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतात तर काही अनूभवातुन शिकावयास लागतात.अनुभवातुन ज्यावेळी माणसाचा कस लागतो.त्याचवेळी माणुस शहाणा होत असतो.
ज्या ज्या वेळी आपल्याला नवनवे अनुभव पहायला मिळतात.यातुनच माणुस आपसुकच घडला जातो.प्रत्येक वेळेस आपण प्रयत्न करून देखिल आपल्या हातात काही लागत नाही त्यावेळी अनुभव आपल्या कामी येतो.यात काही शंका नाही.अनुभव आपल्याला जिवनात शिकवण देत असतो.कोणतीही गोष्ट आपण करताना आपण चुकतो.चुकु द्या कारण चुकीतुनच माणुस शिकतो.व आपल्याला एक प्रकारचा अनुभव देऊन जात असतो.
विविध प्रकारच्या अनुभवांमुळे आपल्याला आयुष्याची वाटचाल योग्य दिशेने करण्यास सहज मदत होते.जन्म आणि मृत्यू मधील प्रवास म्हणजेच जिवन होय.या जिवनात आपण प्रत्येक गोष्टीला कसे सामोरे जातो ते महत्वाचे आहे.जिवनात येणार्या अनुभवातून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे.अनुभव हाच खरा मार्गदर्शक आहे.आयुष्यात जरी चढउतार आले तरी अनुभव आपल्या पाठीशी आहे हे विसरता कामा नये.अशा वेळेस अनुभव आपल्या कामी येत असतात.
आयुष्यात येणारे अनुभव आपल्याला खर्या अर्थाने जिवन संपन्न बनवत असतात.अनुभवासारखे दुसरा कोणताही मार्गदर्शक असु शकत नाही.अनुभवासारखे दुसरे कोणतेही शिक्षण नाही.स्वता:च्या अनुभवातून व इतरांच्या अनुभवातून आपण नेहमी शिकले पाहिजे.काही गोष्टी ह्या अनुभवातून आपल्याला अनुभवायला मिळतात.
Rate Card
जिवनात अनुभव हे नुसते साठवुन ठेवायचे नसतात तर ते उपयोगात आणायचे असतात.जिवनात आपल्याला अनेक परीक्षांचा सामना करावा लागतो.परंतू यात पास व्हायचे असेल तर अनुभव आपल्या पाठीशी पाहिजे. ज्याच्याजवळ अनुभवाची शिदोरी आहे त्याला काही कमी पडत नसते.कारण तो अनुभवाच्या जोरावर अशक्य गोष्ट सहज साध्य करू शकतो. या अनुभवातून तो शहाणा होत जातो.त्यासाठी अनुभवाला खुप मोठे महत्त्व आहे. त्यामुळे आयुष्यात अनुभवासारखा दुसरा मार्गदर्शक  असुच शकत नाही. जीवन अनमोल आहे जीवनात अनुभव हाच खरा मार्गदर्शक आहे.
संतोष दत्तू शिंदे
मु.पो.काष्टी ,ता.श्रीगोंदा ,जि.अहमदनगर
महाराष्ट्र
मो.७७२१०४५८४५

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.