खोजनवाडीच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्वर करोली 

0
2

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील खोजनवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्वर शिदराया करोली यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दत्ता खाडे यांनी उपस्थित होते.

 

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता कायम ठेवत भारतीय जनता पार्टीने सरपंच यशोदा बसवराज काराजनगीसह ६ जागा मिळवत सत्ता मिळवली होती,तर विरोधी पॅनलला चार जागा मिळाल्या होत्या.सरपंच यशोदा बसवराज काराजनगी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड झाली.उपसरपंच पदासाठी ज्ञानेश्वर शिदराया करोली यांती बिनविरोध निवड झाली.निवडीनंतर फटाक्यांच्या आतशबाजी झाल्या.

 

माजी आमदार विलासराव जगताप,आप्पासाहेब नामद, करिअप्पा खांडेकर सह बसवा माधव पॅनेलचे नेते भाऊराज बसर्गी, सिद्धराया गुरबसू काराजनगी,भीमाणा काराजनगी, मुत्तण्णा काराजनगी, मुक्तांना बंडगर, मुत्तण्णा कलमडी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित संरपच,उपसंरपच,सदस्याचा सत्कार करण्यात आला.

 

 

यावेळी बोलताना श्री.जगताप म्हणाले, गट तट पक्षपात बाजूला ठेवून गावचा विकास करण्यास नव्या पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे असे आव्हान केले.नवनिर्वाचित सदस्य संघप्पा गुरुलिंग करोली,महादेवी श्रीकांत बसर्गी,सायव्वा मिरजी, शरणू चंडी उपस्थित होते.तलाठी उदय गुरव, ग्रामसेवक कपील वलकले, मुचंडीचे सरपंच सविता देवर्षी,संखचे मल्लप्पा सिद्धप्पा अवरादी,ककमरीचे बाबांना काराजनगी उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here